Mumbai Airport : मुंबईत ४.८४ कोटी रुपये किंमतीचे सोने जप्त

मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ड्युटी फ्री दुकानात काम करणाऱ्या आणि सोन्याची तस्करी करणाऱ्या टोळीशी संबधित विमानतळ कर्मचाऱ्यांच्या गटाला महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) ताब्यात घेतले. हे कर्मचारी आंतरराष्ट्रीय ट्रान्झिट टर्मिनलमधून छोट्या गटांमध्ये आणलेले सोने विमानतळाबाहेर पोहोचवून त्याची तस्करी करत होते. विमानतळाबाहेर तस्करीचे सोने घेऊन जात असताना डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी विमानतळाच्या दोन कर्मचाऱ्यांना अडवले. त्यानंतर केलेल्या कारवाईत ते सोने ताब्यात घेणाऱ्या दोन जणांना देखील ताब्यात घेतले.



तपासणी दरम्यान ५ अंडाकृती आकाराच्या कॅप्सूल आणि मेणाच्या स्वरूपातील सोन्याच्या भुकटीची २ पाकिटे आढळून आली. चौकशी नंतर, ४.८४ कोटी रुपये किमतीचे ६.०५ किलो सोने जप्त करण्यात आले. मेणाच्या स्वरूपातील (६.०५ किलो) ४.८४ कोटी रुपये किमतीची सोन्याची भुकटी जप्त करण्यात आली, आणि सीमा शुल्क कायदा १९६२ च्या तरतुदींनुसार चारही जणांना अटक करण्यात आली.

Comments
Add Comment

मुंबईत अर्धवट राहिलेल्या ४२५ रस्त्यांच्या कामांना सुरुवात, १५० कामे अद्याप थांबलेलीच

मुंंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या सिमेंट काँक्रिटच्या अर्धवट कामांना आता

मुुलुंड डम्पिंग ग्राऊंडवर धारावी प्रकल्पाचे होणार कास्टींग यार्ड?

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुलुंड डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याची विल्हेवाट लावून जमिन पुनर्प्राप्त करून देण्याच्या

Rain Update : 'मोंथा' चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस, हवामान खात्याचा अलर्ट

मुंबई: भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, 'मोंथा' (Montha)

दिवाळी हंगामात लालपरीची ३०१ कोटींची कमाई

चांगले उत्पन्न आणल्याबद्दल मंत्री प्रताप सरनाईक यांच्यांकडून कर्मचाऱ्यांचे कौतुक मुंबई

मोनोरेल, मेट्रो सेवांसाठीचा आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा...

जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्षांच्या दिल्या अशा सूचना मुंबई (खास प्रतिनिधी) : सार्वजनिक वाहतूक

जागतिक तणावाच्या काळात भारत जगासाठी दीपस्तंभाची भूमिका बजावेल!

मुंबईत पंतप्रधान मोदींचे जागतिक सीईओ फोरममध्ये प्रतिपादन मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (बुधवारी)