Monday, February 17, 2025
Homeब्रेकिंग न्यूजशिवसेना उबाठा गटाचे नगरसेवक भाजपाच्या वाटेवर

शिवसेना उबाठा गटाचे नगरसेवक भाजपाच्या वाटेवर

पुणे : कोकणातील राजापूरचे माजी आमदार राजन साळवी भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यात आता पुण्यातही शिवसेना उबाठाला (Shivsena UBT) मोठे भगदाड पडणार आहे. नव्या वर्षाच्या सुरूवातीलाच पुण्यात राजकीय भूकंपाची चिन्हे आहेत. उबाठा गटाचे पाच माजी नगरसेवक भाजपात प्रवेश करणार असून या नगरसेवकांनी नुकतीच पुण्यातील एका मोठ्या राजकीय नेत्यासोबत भाजपाच्या राज्यातील नेत्यांची मुंबईत जावून भेट घेतली आहे. त्यानंतर लवकरच हे नगरसेवक मुंबई अथवा पुण्यात भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत.

लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांच्या पाठोपाठ राज्यात पुढील काही महिन्यात राज्यात रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका होण्याची शक्यता आहे. त्यातच, राज्यात लोकसभा निवडणूकीत पिछेहाट झालेल्या भाजपाला विधानसभा निवडणूकीत मतदारांनी पसंती दिली असून पुण्यातही भाजपाला शत प्रतिशत यश मिळाले असून भाजपाच्या सर्व जागा निवडून आलेल्या आहेत.

उद्धव गटाला सतावतेय पक्ष फुटीची भीती

त्यामुळे, २०१७ मध्ये महापालिकेवर निर्विवाद यश मिळालेल्या भाजपाची सत्ता महापालिकेतही कायम राहण्याची शक्यता असल्याने उबाठा गटाच्या नगरसेवकांनी धसका घेतला असून भाजपामध्ये जाण्याची तयारी दर्शविली आहे. त्यासाठी, या पाच नगरसेवकांनी नुकतीच मुंबई वारी केली असून त्यांना पक्षात पद देण्यासह, महापालिका निवडणूकीचे तिकिटही देण्याची तयारी भाजपाकडून दर्शविण्यात आली आहे.

त्यामुळे, महापालिका निवडणूकीत भाजपा विरोधात लढण्यापेक्षा त्यांच्या सोबत जाण्याची भूमिका या माजी नगरसेवकांनी घेत भाजपाची वाट धरली असून पुढील काही दिवसात ते भाजपामध्ये जाहीर प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यात काही विधानसभेसाठी इच्छूक असलेल्या माजी नगरसेवकांचाही समावेश असून दोन महिला तर तीन पुरूष माजी नगरसेवकांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माजी नगरसेवक बाळा ओसवाल, विशाल धनवडे, प्राची आल्हाट, संगीता ठोसर, पल्लवी जावळे हे पाच जण भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -