मुंबई : तांत्रिक बिघाड दुरुस्ती किंवा प्लॅटफॉर्म विस्तारिकरणाचे काम करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून (Railway Administration) मेगाब्लॅक घेण्यात येतो. अशातच मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी (Mumbai Pune Railway) समोर आली आहे. येत्या रविवारी मुंबई-पुणे रेल्वे स्थानकादरम्यान पॉवर ब्लॉक (Power Block) घेण्यात येणार आहे. यामुळे मुंबई-पुणे प्रवाशांचे हाल होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Trupti Cottage Alibug : ‘या’ अभिनेत्याच्या बायकोने सुरू केला अलिबागमध्ये व्यवसाय
पुणे-लोणावळा मार्गावरील कामशेत तळेगाव दरम्यान पुलाच्या कामानिमित्त विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. , या ब्लॉग दरम्यान पुणे लोणावळा लोकल रद्द असणार आहेत. त्यावेळी प्रवाशांनी इतर पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. (Mumbai Pune Railway)