सकाळी लावलेले दुभाजक; संध्याकाळी तुटले

वाडा : वाडा शहरातील मुख्य रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी नियंत्रणात येण्यासाठी वाडा नगरपंचायतीने रात्रीच्या सुमारास दुभाजक उभारले होते मात्र एका वाहनचालकामुळे ते संध्याकाळीच आडवे झालेले दिसत आहेत. खंडेश्वरी नाका ते परळी नाका दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा अनधिकृत भाजी,फळे व इतर वस्तू विकणारे व अवास्थव दुचली व चारचाकी वाहने उभी केल्याने वाहतूक कोंडीची मोठी समस्या उद्भवली आहे. दुभाजक लावल्याने वाहन चालक नियमांचे पालन कारून आपली वाहने चालवतील, कुठेही वाहन उभी करणार नाहीत यासाठी रातोरात नगरपंचायतीने दुभाजक उभारले त्या बद्दल वाडा वाशियांनी समाज माध्यमांवर मुख्य अधिकारी व कर्मचाऱ्यांची वाहवा केली पण बेसिस्त वाहनचालकाने धडक दिल्याने एक दुभाचक आडवा झाला आहे, अवघ्या एकाच दिवसात दुभाजकाची अशी अवस्था होत असेल तर महिन्या भरात तरी हे दुभाजक राहतील का असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशा वाहन चालकांवर कारवाई करून तुटलेला दुभाजक काढून त्वरित दुसरा दुभाजक लावण्याची मागणी होत आहे.
Comments
Add Comment

Solapur Accident: पिकअप गाडी विहिरीत कोसळून आठ जणांचा मृत्यू; परिसरात खळबळ!

सोलापूर : सोलापूरच्या माळशिरस मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पिकअप गाडी विहिरीत कोसळल्यामुळे आठ जणांचा

The honor of the palanquin : पालखी रथ आणि चौघडागाडीचा मान पुन्हा संस्थानच्या बैलजोड्यांना

पुणे : जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात पालखी रथ ओढण्याचा तसेच चौघडागाडीचा मान यंदाही श्री संत

जून महिना अर्धा संपला तरीही उन्हाचे चटके कायम

लातूर : जून महिना अर्धा संपत आला असताना लातूर जिल्ह्यात उन्हाचा कडाका कायम आहे. मान्सूनच्या आगमनाकडे

Pune : धरणांतील जलसाठ्यात घट, पाणी जपून वापरण्याचे निर्देश

राज्‍यातील अपु-या पर्जन्‍यमानाच्‍या पार्श्‍वभूमीवर तसेच धरणातील उपलब्‍ध पाणीसाठा विचारात घेवून ३१ ऑगस्‍ट

Pan Masala Sumggling: शेगावात मध्यरात्री ७० लाखांच्या प्रतिबंधित पानमसाल्यासह ट्रक जप्त

Buldhana : पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या शेगाव शहरात अन्न व औषध प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे मोठी कारवाई

Akola Murder Case: धक्कादायक! अकोल्यात 29 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या; अनैतिक संबंधाच्या संशयातून खून

अकोला: अकोला (Akola) शहरात जुन्या वादातून 29 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या (Murder) करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली