Nagpur - Madgaon Express : नागपूर-मडगाव एक्स्प्रेसला सावंतवाडी थांबा मंजूर

सावंतवाडी : नागपूर-मडगाव एक्स्प्रेसला सावंतवाडी थांबा मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडकडून देण्यात आली आहे. कोकण रेल्वे प्रवासी संघटनेकडून याबाबत खासदार नारायण राणे यांचे लक्ष वेधण्यात आले होते. त्यानंतर खा.नारायण राणे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे याबाबत केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. याबाबत कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने खासदार नारायण राणे यांचे आभार मानले आहेत.
गेले काही वर्षे कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी ही सावंतवाडी स्थानकात असणाऱ्या सुविधांसंदर्भात वेळोवेळी संबंधित प्रशासनाकडे दाद मागत होती.



नागपूर मडगाव एक्स्प्रेस सावंतवाडी स्थानकात थांबावी यासाठी अथक प्रयत्न करत होती. ही गाडी काही वर्षांपूर्वी या स्थानकात थांबत होती. सावंतवाडी स्थानकातून अपेक्षित प्रवासी संख्या आणि उत्पन्न या गाडीतून मिळत असताना देखील या स्थानकातून या गाडीचा थांबा रद्द करण्यात आला होता. त्यानंतर प्रवासी संघटनेचा सातत्याने याबाबत पाठपुरावा सुरू होता. हा थांबा मंजूर करण्यासाठी सहकार्य करणारे खासदार नारायण राणे तसेच सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर, कोकण रेल्वे महामंडळाचे क्षेत्रीय रेल्वे प्रबंधक शैलेश बापट यांचे संघटनेतर्फे अध्यक्ष ॲड संदीप निंबाळकर, मिहीर मठकर, विनोद नाईक, भूषण बांदिवडेकर, सागर तळवडेकर, सुभाष शिरसाट यांनी आभार मानले आहेत.

Comments
Add Comment

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद - पंचायत समिती निवडणूक महायुती एकत्र लढणार

भाजपच्या ‘विजय मेळाव्या’त खासदार नारायण राणे यांची घोषणा कणकवली (प्रतिनिधी): राज्यात नुकत्याच पार पडलेल्या

देवगड-आनंदवाडी बंदराचे काम सहा महिने ठप्प!

काम अर्धवट टाकून ठेकेदार पसार देवगड : देवगडचे अर्थकारण बदलणाऱ्या आनंदवाडी बंदर प्रकल्पाचे काम पावसाळ्यापासून

दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात उद्यापासून बदल

सावंतवाडी (वार्ताहर) : प्रवाशांच्या सोयीसाठी आणि गाडी निर्धारीत वेळेत येण्याच्या उद्देशाने मध्य रेल्वेने

Nitesh Rane : आदित्य ठाकरे केवळ ‘काठावर’ पास झालेला विद्यार्थी; मंत्री नितेश राणेंची टीका

सिंधुदुर्ग : "महाविकास आघाडीच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सत्तेचा गैरवापर करून

विधवा प्रथा न पाळणाऱ्यांची घरपट्टी, पाणीपट्टी माफ

कोकणातील ग्रामपंचायतीचे ऐतिहासिक पाऊल कणकवली : विधवा प्रथेला ठाम नकार देत कणकवली तालुक्यातील कलमठ

ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्याला नवी उभारी!

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा असलेला ऐतिहासिक विजयदुर्ग