

Weather Update : उत्तर भारतात थंडीची लाट
नवी दिल्ली : संपूर्ण उत्तर भारतात थंडीची लाट आली आहे. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड येथील डोंगराळ भागापासून ते दिल्लीच्या मैदानी भागापर्यंत ...
अपघात झाला त्यावेळी कारमध्ये खासदार रवींद्र वायकर होते. ते सुखरुप आहेत. अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. अपघात प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.

Navi Mumbai Airport : इंडिगोचे प्रवासी विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले!
'या' तारखेपासून सुरु होणार व्यावसायिक विमानसेवा नवी मुंबई : नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (Navi Mumbai Airport) काम जवळपास पूर्ण झाले असून लवकरच हे ...
कोण आहेत रवींद्र वायकर ?
रवींद्र वायकर हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे खासदार आहेत. याआधी ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते आणि मुंबईतील जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून कार्यरत होते. पण एप्रिल २०२४ मध्ये त्यांनी शिंदेंना साथ देण्याचा निर्णय घेतला. रवींद्र वायकर १९९२ पासून सलग चार वेळा मुंबई महापालिकेत नगरसेवकपदाची निवडणूक जिंकले आहेत. ते २००६ पासून मुंबई महापालिकेत स्थायी समितीचे अध्यक्ष अध्यक्ष झाले. त्यांनी २००९ मध्ये पहिल्यांदा विधानसभेत आमदार म्हणून प्रवेश केला. ते २०१४ मध्ये फडणवीस सरकारमध्ये गृहनिर्माण तसेच उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री होते. रवींद्र वायकर यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून उद्धव ठाकरे गटाच्या अमोल कीर्तिकर यांचा पराभव केला. रवींद्र वायकर हे लोकसभा निवडणुकीत ४८ मतांनी विजयी झाले.