नवी दिल्ली : संपूर्ण उत्तर भारतात थंडीची लाट आली आहे. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड येथील डोंगराळ भागापासून ते दिल्लीच्या मैदानी भागापर्यंत सर्वत्र कडाक्याची थंडी पडली आहे. दिल्लीत शुक्रवारी पाऊस पडल्यामुळे थंडीची तीव्रता वाढली आहे.
IND vs AUS: मेलबर्न कसोटीत भारत खराब स्थितीत, लंचपर्यंत गमावले ३ विकेट
हवामान विभागाच्या अंदाजानुसार सोमवार ३० डिसेंबर रोजी दिल्लीत सकाळी धुकं पडेल. किमान तापमान सहा अंश से. तर कमाल तापमान १८ अंश से. असेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दिल्लीत रविवारी किमान तापमान १३ अंश से. आणि कमाल तापमान १८ अंश से. होते. दिल्लीत धुक्यामुळे दृश्यमानता कमी होईल, असाही अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून चालकांनी धुक्यातून वाहने चालवणे टाळावे आणि आवश्यकताच असेल तर हेडलाईट सुरू ठेवून आणि वेग नियंत्रणात ठेवून वाहन चालवावे असे आवाहन दिल्ली पोलिसांच्या वाहतूक विभागाने केले आहे. धुक्याचा परिणाम रेल्वे आणि विमानांच्या वाहतुकीवरही होण्याची शक्यता आहे.
Winter diet: शरीराला आतून उष्ण ठेवतील किचनमध्ये ठेवलेले हे ५ मसाले
हिमवृष्टी आणि पावसामुळे जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड येथील पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे. वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला आहे. पर्यटक वाढल्यामुळे जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड येथे प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीचा वेग मंदावला आहे.
अर्थव्यवस्थेसाठी चालना देणाऱ्या तरुण निर्मिकांचे योगदान उर्जापूर्ण आणि धडाडीचे – पंतप्रधान
सध्या जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि बिहार या सर्वच राज्यांमध्ये थंडीची तीव्रता वाढली आहे. धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाली आहे. रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतूक आणि विमान वाहतूक मंदावली आहे. वाहतुकीचा वेग मंदावल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.
वातावरण बदलल्यामुळे पर्यटनस्थळी गर्दी वाढली आहे. आणखी काही दिवस थंडीची तीव्रता कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.