Sunday, March 23, 2025
Homeब्रेकिंग न्यूजNavi Mumbai Airport : इंडिगोचे प्रवासी विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले!

Navi Mumbai Airport : इंडिगोचे प्रवासी विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले!

‘या’ तारखेपासून सुरु होणार व्यावसायिक विमानसेवा

नवी मुंबई : नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (Navi Mumbai Airport) काम जवळपास पूर्ण झाले असून लवकरच हे विमानतळ प्रवाशांसाठी सज्ज होणार आहे. काही दिवसांपूर्वीच या विमानतळावर वायुदळाचे सी २९५ आणि सुखोई ३० या विमानांच्या यशस्वी लँडिंगनंतर आज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिल्या व्यावसायिक विमानाचे लँडिग झाले आहे. त्यामुळे लवकरच ही सेवा सुरु होणार असून नवी मुंबई विमानतळ प्रवाशांना नववर्षाची भेट मिळाली आहे.

महिन्याभरापूर्वी नवी मुंबई विमानतळावर करण्यात आलेली लँडिंग टेस्ट यशस्वी झाल्यानंतर आज इंडिगोचे प्रवासी विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. आज दुपारच्या सुमारास व्यावसायिक विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रनवेवर लँडिंग केले असून यावेळी सिडको आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.

Gautami Patil : गौतमी पाटीलने केलं प्राजक्ता माळीच्या भूमिकेचं समर्थन

कधीपासून होणार सुरु?

येत्या नववर्षात मार्च महिन्यार्पंत विमानतळाबाबत सर्व परवानग्या मिळणार असून १७ एप्रिल २०२५ मध्ये पहिले प्रवासी आणि कार्गो विमान सुरू होणार आहे. ही विमानसेवा देशाची सर्वात मोठी कार्गो प्रणाली असल्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार वाढेल आणि स्थानिक व्यवसायांना चांगलाच फायदा होणार आहे.

दरम्यान, १७ एप्रिल रोजी देशांतर्गंत विमानसेवेचे उद्घाटन होणार आहे. तर, आंतरराष्ट्रीय विमानसेवेचे उद्घाटन जून महिन्यापर्यंत होईल, असे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे सीईओ बी.व्ही.जेके शर्मा यांनी सांगितले आहे.

काय आहेत वैशिष्टये?

नवी मुंबई विमानसेवा कार्यान्वित झाल्यानंतर दरवर्षी ९० दशलक्ष प्रवासी हाताळेल अशी अपेक्षा आहे. सध्या ३.७ किमी धावपट्टी ऑपरेशनसाठी तयार आहे, लवकरच दुसरी धावपट्टी बांधण्याची योजना आहे. त्याचबरोबर भूमिगत मेट्रो द्रुतगती मार्ग, अटल सेतू पूल, बुलेट ट्रेन सेवा या बहुविध वाहतूक पर्यायांमुळे विमानतळ प्रवेशयोग्य होईल आणि प्रवाशांचा प्रवास वेळ देखील कमी होणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -