Chameli Ber : बोरं आहेत की ॲप्पल? मार्केटमध्ये ‘चमेली’ खातेय भाव!

बोरं भरीव, मगजदार असल्याने बाजारात सर्वाधिक मागणी


वाडा : अ‍ॅप्पल बोर हे मूल थायलंड देशातील फळ पीक आहे. उत्तम पश्चिम बंगाल राज्यात ॲपल बोरचे उत्पादन घेण्यात आले. त्यानंतर देशभरात सर्व भागात हे फळ पीक घेतले जात आहे. अधिक वजनदार आणि मगसदार असल्याने बोर चवीला गोड आणि तुरट आहे. मधुमेह असलेल्या नागरिकांसाठी ते आरोग्यदायी आरोग्यदायी मानले जाते. दुष्काळी भागात कमी पाण्यात अधिक उत्पादन देणारे पीक म्हणून ॲपल बोर या पिकाकडे पाहिले जाते. एका झाडाला ३० ते ४० किलो बोरं लागतात. एक किलोत आठ ते दहा बोरंस बसतात इतके वजनदार बोर असते. या बोरांची झाडे प्रचंड काटक असतात. (Chameli Ber)



वातावरणात या बोरांच्या झाडांची वाढ होते. ३७ ते ४८ अंश सेल्सिअसमध्ये या झाडांची जोमाने वाढ होते. आग अथवा इतर कुठल्याही कारणाने झाडाचे नुकसान झाले तरी झाड जोमाने उभे राहते. ॲप्पल बोर वालुमिश्रित दगडाच्या खडकाळ मंगला निचरा होणाऱ्या जमिनीतील या झाडाची वाढ होते. हे पीक शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न देणारे आहे.


ॲपल बोर हे संकरित आणि निरोगी आहे. त्यामुळे त्याचे आरोग्यदायी गुणधर्म पाहायला मिळतात. बाजारात या बोराला चांगले दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी ॲप्पल बोराची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. बोरा मध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आणि लोहाचे प्रमाण अधिक असते. पोषणाच्या दृष्टीने सफरचंदापेक्षा ॲप्पल बोर श्रेष्ठ मानले जाते. यातील परिपक्व बोराचा औषधासाठी वापर केला जातो.


बाजारात ॲप्पल बोर मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत. या बाेराला ८० रुपये किलो दर आहे बोर भरीव आणि मगजदार असल्याने बाजारात सर्वाधिक मागणी आहे. बाजारात विक्री करता असलेले बोर ही हिरव्या रंगाचे असून सफरचंदासारखा आकार आहे. यातून ग्राहकांचा बोर खरेदीचा कल वाढला आहे. (Chameli Ber)



बाजारात चमेलीची जादू


बाजारात छोट्या आकाराची लालसर अॅप्पल बोरं आहेत. हे सफरचंदासारखी दिसतात; परंतु आकाराने छोटी आहेत. याचा गोडवा चांगला असतो. या मुळे ही बोरे खरेदी केली जातात. आकर्षक रंगाने बाजारात या फळाला चांगली मागणी आहे.



दर ग्राहकांच्या आवाक्यात


बाजारात मागणीनुसार विविध फळांची उपलब्धता करून दिली जाते हे दर ग्राहकांच्या आवाकात आल्याने बाजारात खरेदी होत आहे, असे व्यवसायिकांनी सांगितले.

Comments
Add Comment

पिंपरीत भाजप स्वबळावर लढणार

भाजप-अजित पवार गट आमने-सामने पिंपरी : महायुती सरकारमध्ये सहभागी असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे

डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांचा फलटण दौरा

सातारा: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी आतापर्यंत दोन आरोपींना अटक झाली आहे.

रिद्धपूर येथे जागतिक कीर्तीचे विद्यापीठ साकारणार: फडणवीस

नाशिक : रिद्धपूर या तीर्थक्षेत्राने मराठी भाषा जीवंत ठेवण्याचे काम केले असून तेथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या व्यासपीठावर मनोज जरांगे येणार का?

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे

Sanjay Shirsat : संजय शिरसाटांच्या मनात नेमकं चाललंय काय? निवृत्ती की राजकीय खेळी?

शिंदे गटाच्या आमदाराच्या निर्णयामागे कुटुंबातील 'नवे नेतृत्व' आणण्याची खेळी? मुंबई : राज्याचे समाजकल्याण

मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर दोन महिला अधिकाऱ्यांमध्ये खुर्चीवरून भांडण! नागपूरचे पोस्टमास्टर जनरलपद नेमके कुणाकडे?

एकीने दुसरीच्या अंगावर पाणी ओतलं, चिमटाही काढला नागपूर : नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या