Nitish Kumar Reddy : नितीशची ऐतिहासिक कामगिरी

मेलबर्न : बॉर्डर गावसकर कसोटी करंडक स्पर्धेतील चौथ्या कसोटीत तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला. नितीश रेड्डीने केलेल्या शतकामुळे फॉलोऑनचे संकट टळले असले तरी अद्याप भारत ११६ धावांनी पिछाडीवर आहे. नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद ४७४ धावा केल्या. भारताने पहिल्या डावात तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत नऊ बाद ३५८ धावा केल्या. नितीश रेड्डी १०५ आणि मोहम्मद सिराज २ धावांवर खेळत आहे. शतकवीर नितीशने आतापर्यंत १७६ चेंडू खेळून एक षटकार आणि दहा चौकारांच्या जोरावर नाबाद १०५ धावा केल्या आहेत.



नितीश रेड्डी ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेत सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय फलंदाज झाला आहे.त्याने ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बॉर्डर गावसकर कसोटी करंडक स्पर्धेत आतापर्यंत आठ षटकार मारले आहेत. याआधी मायकल वॉनने २००२ - ०३ मध्ये ऑस्ट्रेलियातील ॲशेस मालिकेत आठ षटकार मारले होते. वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलने २००९ - १० मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत आठ षटकार मारले आहेत.आणखी एक षटकार मारताच नितीश रेड्डी हा ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेत सर्वाधिक षटकार मारणारा अव्वल फलंदाज होणार आहे.



ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव - सर्वबाद ४७४ धावा
भारताचा पहिला डाव - नऊ बाद ३५८ धावा
यशस्वी जयस्वाल ८२ धावा, रोहित शर्मा ३ धावा, केएल राहुल २४ धावा, विराट कोहली ३६ धावा, आकाश दीप शून्य धावा, रिषभ पंत २८ धावा, रविंद्र जाडेजा १७ धावा, नितीश कुमार रेड्डी नाबाद १०५ धावा, वॉशिंग्टन सुंदर ५० धावा, जसप्रीत बुमराह शून्य धावा, मोहम्मद सिराज नाबाद दोन धावा, अवांतर ११



ऑस्ट्रेलियात पहिले कसोटी शतक झळकावणारे तरुण भारतीय क्रिकेटपटू

  1. सचिन तेंडुलकर - सिडनी १९९२ - वय : १८ वर्षे २५६ दिवस

  2. रिषभ पंत - सिडनी २०१९ - वय : २१ वर्षे ९२ दिवस

  3. नितीश रेड्डी - मेलबर्न २०२४ - वय : २१ वर्षे २१६ दिवस

  4. दत्तू फडकर - अॅडलेड १९४८ - वय : २२ वर्षे ४६ दिवस


बॉर्डर - गावसकर ट्रॉफी (भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया)

  1. पहिली कसोटी, पर्थ - भारताचा २९५ धावांनी विजय

  2. दुसरी कसोटी, अॅडलेड - ऑस्ट्रेलियाचा दहा गडी राखून विजय

  3. तिसरी कसोटी, ब्रिस्बेन - सामना अनिर्णित

  4. चौथी कसोटी, मेलबर्न - खेळ सुरू आहे

  5. पाचवी कसोटी, सिडनी - खेळ ३ जानेवारी २०२५ पासून सुरू होणार

Comments
Add Comment

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma :घटस्फोटानंतर पुन्हा एकत्र येणार ? चहल म्हणाला..

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma : भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि चहलची पुर्व पत्नी हे ईनफ्लुन्सर धनश्री वर्मा हे दोघेजन पुन्हा

मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर दुटप्पी!

मोहम्मद कैफ याचे संघ व्यवस्थापनावरही गंभीर आरोप नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय

मुंबई इंडिन्सचा गुजरात जायंट्सवर सात बळी राखून विजय

कर्णधार हरमनप्रित कौरची आक्रमक खेळी नवी मुंबई : विजयासाठी १९३ धावांचे आव्हान घेवून मैदानात उतरलेल्या मुंबई

शिखर धवनच्या आयुष्यात नवी इनिंग! सोफी शाइनसोबत उरकला साखरपुडा

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर शिखर धवनने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा गाठत

आयसीसी क्रमवारीतील अव्वल स्थानाकडे विराट कोहलीची वाटचाल

वडोदरा : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानाला आता धोका

महिला प्रीमियर लीग: हरमनप्रीत-सायव्हरचा झंझावात

मुंबई इंडियन्सचा दिल्ली कॅपिटल्सवर ५० धावांनी विजय मुंबई : वानखेडे स्टेडियमवर महिला प्रीमियर लीगच्या तीसऱ्या