भयंकर! नायलॉन मांजामुळे कानापर्यंत कापले गेले तोंड

शेवगाव : मकर संक्रांतीचा सण म्हणजे पंतगबाजीला मोठी पर्वणी असते. शेवगाव शहर परिसर देखील त्यास अपवाद नाही. सध्या पतंगबाजीला येथे चांगलेच उधाण आले आहे. मात्र अनेकजण पंतगबाजीच्या या धुमधडाक्यात नायलॉन व विशिष्ट प्रक्रिया केलेला चायना मांजा सर्रास वापरत असतात. या मांज्याने अपघात होतात गळ्यात गुंतून गळा चिरून प्राण गमावल्याची अनेक उदाहरणे आहेत. म्हणूनच या मांज्यावर कायद्याने बंदी असूनही पंतगबाजांना तो सहज उपलब्ध होतो ही वस्तुस्थिती आहे. अशा प्रकारच्या चायना मांजाने येथील एकाच्या तोंडाला कापल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मिरी मार्गावर गुरुवारी सायंकाळी घडली.

अमीन फिरोज शेख (वय १६, रा. इदगाह मैदान, शेवगाव) असे जखमीचे नाव असून त्याच्यावर शेवगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


याबाबत अधिक माहिती अशी की, अमीन शेख हा न्यू आर्टस् महाविद्यालयामध्ये १२ वीत आहे. तो गुरुवारी शेवगाव - मिरी रस्त्याने वडुले बुद्रक (ता. शेवगाव) येथून शहराकडे येत होता. दरम्यान तो मिरी मार्गावरील फलके किराणा दुकानासमोरुन जात असताना त्याच्या तोंडाला नायलॉन मांजा अडकला. मांजामुळे तोंडापासून ते कानापर्यंत कापले गेले.



मांजा धारदार असल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. वाहन वेगात असल्याने तो वाहनासह रस्त्यावर पडल्याने तो बेशुध्द पडला. रक्तस्त्राव सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांनी त्याला त्वरित जवळील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.


डॉक्टरांनी त्याच्यावर तातडीने उपचार करून रक्तस्त्राव थांबविला. यात अमीन याच्या तोंडाला आतून व बाहेरून २६ टाके घालण्यात आले आहेत. सुदैवाने या अपघातातून तो वाचला असला, तरी त्याला गंभीर दुखापत झाली आहे.


मकर संक्रातीच्या काळात पतंग उडविणारांची संख्या वाढत आहे. काही व्यावसायिक आर्थिक लालसेपोटी बंदी असलेल्या नायलॉन मांजाची मोठ्या प्रमाणात विक्री करत आहेत. या धारदार मांजामुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो. याबाबत पोलीस प्रशासन व शेवगाव नगरपालिका प्रशासनाने त्वरीत नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

Comments
Add Comment

थेट शर्यतीत पळणाऱ्या बैलांवर भानामती! कोल्हापूरातील स्मशानात आढळून आला अंधश्रद्धेचा प्रकार

कोल्हापूर: अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार कोल्हापूरातून समोर आला आहे. कोल्हापूरातील हातकणंगले तालुक्यातील

घरगुती ग्राहकांसाठी प्रीपेड मीटर नाही : मुख्यमंत्री

नागपूर : राज्यात स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत घेण्यात आला आहे. मात्र, सामान्य

हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले, पुढील अधिवेशन २३ फेब्रुवारीला मुंबईत

नागपूर : नागपुरच्या गुलाबी थंडीत गेल्या एक आठवड्यापासून सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचे सूप अखेर वाजले. पुढील

मुंबईकरांना हक्काचं घर आणि विदर्भाला विकासाचं वैभव!

अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही "मुंबई फास्ट, महाराष्ट्र

मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे 'रेहमान डकैत' कोण..?

महानगरपालिका निवडणूक जिंकून महायुतीच ठरेल असली ' धुरंधर ' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उबाठावर घणाघाती

Winter Session : पाच वर्षे एकही योजना बंद करणार नाही!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही; चंद्र-सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच राहणार मुंबई : “निवडणुका