Friday, March 28, 2025
Homeताज्या घडामोडीChenab railway bridge : जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे पुलाचे काम पूर्ण

Chenab railway bridge : जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे पुलाचे काम पूर्ण

काश्मीर ते कन्याकुमारी रेल्वे मार्ग सुरू होण्याची शक्यता

श्रीनगर : जगातील सर्वात उंच पूल अशी ओळख असणाऱ्या चिनाब पुलाचे (Chenab railway bridge) काम आता पूर्ण झाले आहे. रेल्वे मंत्रालयाने पत्रकारांचा दौरा या पुलाच्या ठिकाणी आयोजित केला होता.त्यावेळी ही‌ माहिती देण्यात आली आहे.आता या पुलाचे काम पूर्ण झाल्याने २६ जानेवारी रोजी काश्मीर ते कन्याकुमारी हा रेल्वे मार्ग सुरू होण्याची शक्यता आहे.

”चिनाब नदीवरील रेल्वे पूल हा केवळ एक पूल नाही, तर भारताच्या तंत्रज्ञान, धैर्य, आणि दृढनिश्चयाचा हा पुरावा आहे. हा पूल स्थानिक जनतेसाठी जीवनरेखा ठरेल आणि जागतिक पातळीवर भारताचे नाव उंचावेल. यामुळे केवळ आर्थिक विकास नाही तर सांस्कृतिक आणि राष्ट्रीय एकात्मतेलाही प्रोत्साहन मिळेल,” असे सरकारचे म्हणणे आहे.जम्मू काश्मीरमध्ये सद्या बनिहाल ते संगलदान या उत्तर भागात तर जम्मू ते कटरा अशी दक्षिणेकडे रेल्वे सुरू आहे. कटरा ते संगलदान या मधल्या‌ टप्प्यात रेल्वे सुरू करण्यासाठी चिनाब आणि अंजी हे दोन पूल पूर्ण होणे आवश्यक होते. आता ते पूर्ण झाल्याने २६ जानेवारी रोजी काश्मीर ते कन्याकुमारी हा रेल्वे मार्ग सुरू होऊ शकतो.

Abdul Rehman Makki : मुंबई हल्ल्याचा सूत्रधार, मोस्ट वाँटेड दहशतवादी अब्दुल रहमान मक्कीचा मृत्यू

चिनाब नदीवरील जगातील सर्वात उंच रेल्वे पूल हा भारताच्या जम्मू-कश्मीर प्रदेशातील उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पाचा एक भाग आहे. हा पूल भारतीय रेल्वेने बांधला असून, त्याचे नाव ‘चिनाब रेल्वे पूल’ असे आहे. हा पूल ४६९ मीटर उंचीवर आहे, जो पॅरिसमधील आयफेल टॉवरपेक्षा सुमारे ३५ मीटर जास्त उंच आहे.चिनाब रेल्वे पुलाची उंची ३५९ मीटर (डेक ते नदी) आहे, तर त्याची एकूण लांबी १३१५ मीटर आहे. १७६ मीटरची मुख्य कमान पुलाचा प्रमुख भाग आहे. स्टील, काँक्रीट वापरून हा पूल बांधण्यात आला आहे.

अतिशय मजबूत आणि टिकाऊ बांधकाम असल्याने हा पुल भूकंप आणि वाऱ्याचा दाब सहन करू शकेल. या पुलावर विषम हवामान, स्फोट, आणि अन्य आपत्तीपासून संरक्षित करण्यासाठी आधुनिक सुरक्षा प्रणाली बसवण्यात आल्या आहेत. यामध्ये रेल्वे मार्गावर ऑटोमॅटिक सिग्नलिंग प्रणाली, जीपीएस ट्रॅकिंग, आणि इतर अत्याधुनिक सुविधांचा समावेश आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -