Nashik Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात ४ वर्षीय चिमुरडा जखमी, प्रकृती गंभीर

नाशिक : नाशिक रोड परिसरातील विहितगाव, हांडोरे मळ्यात एका चारवर्षीय चिमुरड्यावर बिबट्याने हल्ला केला. यात चुिमरडा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते, नंतर त्यास खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. गुरुवारी सायंकाळी ७.३० च्या सुमारास ही घटना घडल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.


विहितगाव परिसरात बिबट्यांचा मुक्त वावर रहिवाशांमध्ये दहशत निर्माण करणारा ठरत आहे. यापूर्वी देखील या भागात लहान मुलांवर बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. दरम्यान, ऋषिकेश प्रकाश छंद्रे हा चार वर्षाचा चिमुरडा घराबाहेर खेळत असताना, अचानकच बिबट्याने त्याच्यावर झडप घातली. बिबट्याने त्याच्या मानेवर, डोक्यावर तसेच चेहऱ्यावर पंजा मारत नखांनी गंभीर जखमी केले. तसेच त्याला फरपटत नेण्याचा प्रयत्न केला ही बाब त्याच्या कुटुंबीयांना समजताच त्यांनी आरडाओरडा करीत, बिबट्याचा पाठलाग केला. त्यामुळे बिथरलेल्या बिबट्याने ऋषिकेशला सोडत धूम ठोकली. गंभीर जखमी अवस्थेत त्याला नाशिक रोड येथील बिटको रुग्णालयात आणण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक जगदीश पवार यांनी रुग्णालयात धाव घेतली. तसेच वनविभागाच्या



अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाचारण करीत, बिबट्याचा शोध घेण्यास सांगितले. दरम्यान, ऋषिकेश गंभीर जखमी असल्याने, बिटको रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ पाठविले. सध्या त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बिबट्याच्या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, त्याचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

Comments
Add Comment

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट समोर ; म्हणून न्यायालयाने पुढे ढकलली सुनावणी

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

साऊथचे सुपरस्टार 'रजनीकांत' चे काय आहे खरे नाव ?

रजनीकांत म्हणून ओळखले जाणारे दाक्षिणात्य तसेच हिंदी चित्रपटांमद्धे नावाजलेले असे ,'थलायवा' अर्थात रजनीकांत

'तरूणांसाठी' पोकोचा नवा C85 5G स्मार्टफोन बाजारात लॉच

मुंबई: व्हॅल्यू फॉर मनी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पोको (POCO) ब्रँड हा तरुणाईला नेहमीच भावतो. अशातच कंपनीने आपल्या

पाकिस्तानच्या इतिहासात आयएसआय प्रमुखाला पहिल्यांदाच शिक्षा

जनरल फैज हमीद यांना १४ वर्षे तुरुंगवास इस्लामाबाद : भारताविरोधात कटकारस्थाने रचणारी पाकिस्तानची गुप्तचर

फ्रान्समध्ये वीज झाली पूर्ण मोफत

युरोप  : फ्रान्स देशात काही विशिष्ट कालावधीसाठी विजेची किंमत अचानक 'शून्य' झाली आहे. मागणीत मोठी घट आणि उत्पादनात

काळा घोडा परिसराचे सुशोभीकरण, महापालिका आयुक्तांनी घेतला आढावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक वारसा आणि पुरातन वास्तू असलेला परिसर म्हणून काळा घोडा