
नवी दिल्ली: आपल्या आर्थिक सुधारणांच्या जोरावर अर्थव्यवस्थेला प्रगतीच्या पथावर अग्रेसर करणारे भारताचे माजी पंतप्रधान आणि अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरूवारी रात्री निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात त्यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे पार्थिव रात्रीच त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शोक व्यक्त केला. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर केंद्राकडून सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. देशात ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
मनमोहन सिंग यांच्या निधनाचे वृत्त समजताच काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी, खासदार प्रयिगं गांधी , भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जगतप्रकाश नड्डा हे एम्समध्ये पोहोचले. यावेळेस काँग्रेसची कर्नाटकच्या बेळगावात सुरू असलेली कार्यकारिणीची बैठकही रद्द करण्यात आले. काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे हे ही तातडीने एम्सच्या दिशेने निघाले आणि गुरूवारी मध्यरात्री पोहोचले.

मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळवला जात आहे. या सामन्यात ...
एनसीपी(सपा)अध्यक्ष शरद पवार यांनीही गुरूवारी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना म्हटले, देशाने एक महान अर्थशास्त्री, दूरदर्शी सुधारक आणि राजकीय नेता गमावला आहे. ते पुढे म्हणले, भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाचे वृत्त ऐकून खूप दु:ख झाले. आपल्या देशाने महान अर्थशास्त्रांपैकी एक दूरदर्शी सुधारक आणि जागतिक नेत्याला गमावले आहे. त्यांची पोकळी सतत जाणवेल. त्यांनी घालून दिलेला आदर्श अनेक पिढ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायक असेल. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.