मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळवला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय़ घेतला होता.
पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने ६ बाद ३११ धावा केल्या होत्या. आता दुसऱ्या दिवसाचा खेळ भारताच्या हिशेबाने महत्त्वपूर्ण आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी भारतीय खेळाडूने दंडाला काळी पट्टी बांधत मैदानात उतरले आहेत.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सन्मानार्थ भारतीय खेळाडूंनी आपल्या हाताला ही काळी पट्टी बांधली आहे. दोन वेळा देशाचे पंतप्रधान राहिलेले मनमोहन सिंग यांचे २६ डिसेंबरला निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
Manmohan Singh: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन, वयाच्या ९२व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मेलबर्न कसोटीसाठी भारताची प्लेईंग ११
यशस्वी जायसवाल, रोहित शर्मा(कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, ऋषभ पंत(विकेटकीपर), नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, आकाशदीप, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.