Monday, March 24, 2025
HomeदेशOMG : अरे देवा! हिमाचलमध्ये बर्फवृष्टीचा कहर! हजारो पर्यटक अडकले; ४ जणांचा...

OMG : अरे देवा! हिमाचलमध्ये बर्फवृष्टीचा कहर! हजारो पर्यटक अडकले; ४ जणांचा मृत्यू

बर्फवृष्टीमुळे २२३ रस्ते बंद; १,५०० वाहने बर्फात अडकली, ८ हजार पर्यटकांची २४ तासानंतर सुटका

आणखी दोन दिवस बर्फवृष्टी आणि पावसाचा इशारा

शिमला : हिमाचल प्रदेशातील शिमला आणि मनालीमधल्या हवामानामुळे ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक या ठिकाणी दाखल झालेल्या पर्यटकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, त्याचवेळी गेल्या २४ तासांमध्ये हिमाचल प्रदेशात झालेल्या बर्फवृष्टीमुळे (Snowfall) ४ जणांचा मृत्यू झाला आहे. हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टीमुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. कुल्लूमधील धुंडी आणि मनाली-लेह महामार्गावरील अटल बोगद्याच्या उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील दरवाजांवर सुमारे १,५०० वाहने बर्फात अडकल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. ही वाहने हटवण्यासाठी मोठी बचाव मोहीम राबवण्यात आली आहे. अटल बोगदा आता प्रवाशांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे लांब वाहतूक कोंडी निर्माण झाली आणि अनेक पर्यटक रात्रभर वाहनांमध्ये अडकून पडले आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हिमाचल प्रदेशमध्ये वाहन घसरल्याने झालेल्या वेगवेगळ्या अपघातात चार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच अनेक भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे. मनालीचे डीएसपी केडी शर्मा यांनी सांगितले कि, ‘सोमवारी दुपारी २ वाजता सुरू झालेले बचावकार्य रात्रभर सुरू राहिले, ज्यामध्ये लोकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांनी शून्य तापमानात अथक परिश्रम घेतले. दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत सर्व वाहने बाहेर काढण्यात आली आणि अडकलेल्या सर्व ८ हजार पर्यटकांची सुटका करण्यात आली.’ मुसळधार बर्फवृष्टीमुळे मनाली-लेह महामार्गावरील वाहनांच्या वाहतुकीवरही परिणाम झाला, त्यामुळे प्रवाशांना विलंब आणि समस्यांना सामोरे जावे लागले.

Supreme Court : आरोपींचा फोन किंवा लॅपटॉप डेटा तपासण्यास सर्वोच्च न्यायालयाकडून बंदी; ईडीला देखिल दिले नवे आदेश?

हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टीमुळे तीन राष्ट्रीय महामार्गांसह किमान २२३ रस्ते बंद करण्यात आले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली आहे. बर्फाचा थर साचल्यामुळे ७०० पेक्षा जास्त वीजेचे रोहित्र बंद करण्यात आले आहेत. अटारी आणि लेह दरम्यानचा राष्ट्रीय महामार्ग, कुल्लू जिल्ह्यातील सेंज ते औट, किन्नौर जिल्ह्यातील खाब संगम आणि लाहौल-स्पीती जिल्ह्यातील ग्रम्फू यासह सुमारे २२३ रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.

हिमाचल प्रदेशातील सात जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस सतत बर्फवृष्टी आणि पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. २६ डिसेंबरच्या रात्री वेस्टर्न डिस्टर्बन्स पुन्हा सक्रिय होईल, त्यामुळे २७ आणि २८ डिसेंबर रोजी पर्वतांमध्ये पाऊस आणि हिमवर्षाव होण्याची शक्यता आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -