अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव पुन्हा एकदा धोकादायक पातळीवर पोहोचला आहे. अमेरिकन लष्कराने इराणच्या किनारपट्टीवरील महत्त्वाच्या रडार आणि निगराणी केंद्रांवर लक्ष्यित हल्ले केल्याने मध्यपूर्वेत युद्धाचे ढग अधिक गडद झाले आहेत. या कारवाईनंतर इराणने तीव्र प्रतिक्रिया देत अमेरिकेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. (Iran - America War)
होर्मुझ सामुद्रधुनीजवळ अमेरिकेची कारवाई :
अमेरिकन संरक्षण अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, होर्मुझ सामुद्रधुनी परिसरातील सागरी हालचालींवर लक्ष ठेवणाऱ्या इराणी यंत्रणांवर ही कारवाई करण्यात आली. या भागात कार्यरत काही ड्रोन आणि निगराणी प्रणाली आंतरराष्ट्रीय जहाजवाहतुकीसाठी धोका निर्माण करत असल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. यानंतर अमेरिकन सैन्याने इराणच्या गोरुक भागातील तसेच केशम बेटाजवळील रडार आणि निगराणी केंद्रांवर अचूक हल्ले केले. होर्मुझ सामुद्रधुनीजवळील ही दोन्ही ठिकाणे सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जातात. (Iran - America War)
पुणे : पुण्यात पुन्हा एकदा कथित रेव्ह पार्टीचा (Raid On Pune Rave Party) पर्दाफाश झाला असून गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यरात्री टाकलेल्या छाप्यात मोठी कारवाई केली आहे. ...
इराणचा संतप्त सूर; अमेरिकेवर गंभीर आरोप :
अमेरिकेच्या या कारवाईनंतर इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र निषेध नोंदवला आहे. मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अमेरिकेची ही कृती प्रादेशिक शांततेला धक्का देणारी असून विद्यमान शस्त्रसंधी कराराच्या भावनेच्या विरोधात आहे. इराणने असा इशाराही दिला आहे की, अशा प्रकारच्या लष्करी हालचालींमुळे संपूर्ण आखाती प्रदेशातील तणाव आणखी वाढू शकतो आणि त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. (Iran - America War)
IRGC चा प्रतिहल्ल्याचा दावा :
कुवेतमध्ये क्षेपणास्त्रांचा धोका, हवाई संरक्षण यंत्रणा सतर्क :
या वाढत्या संघर्षाचा परिणाम आखाती देशांवरही दिसून येत आहे. कुवेतच्या लष्कराने सांगितले की, देशाच्या हवाई हद्दीकडे येणारी अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे हवाई संरक्षण प्रणालीने यशस्वीपणे रोखली. काही क्षेपणास्त्रांचे अवशेष निवासी भागांमध्ये पडल्याने मालमत्तेचे नुकसान झाले असले तरी कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात असल्याचे कुवेती अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. (Iran - America War)
नवी दिल्ली : भारताने पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रांमध्ये (UN) त्याची खरी जागा पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. जम्मू आणि काश्मीरवरील पाकिस्तानच्या अनावश्यक ...
बहरीनमध्ये धोक्याचे सायरन; नागरिकांना सतर्कतेचा इशारा :
दुसरीकडे, बहरीनमध्ये सुरक्षा यंत्रणांनी खबरदारीचा उपाय म्हणून धोक्याचे सायरन वाजवले. संभाव्य हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले. मध्यपूर्वेतील वाढत्या तणावामुळे अनेक देशांनी आपल्या सुरक्षा व्यवस्थांना अलर्टवर ठेवले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राजनैतिक स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. (Iran - America War)






