भिवंडी : तबेल्यातील म्हशींच्या कासरा मधून जास्त दूध मिळावे यासाठी दिल्या जाणा-या इंजेक्शनची (Oxytocin) बनावट निर्मिती करणा-या कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकून केलेल्या कारवाईत तब्बल साडेसात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत दोन आरोपींना अटक केली आहे तर एक जण फरार आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दुभत्या म्हशींना अधिक दुधासाठी ‘ऑक्सिटोसिन’ या औषधाचा वापर केला जातो. परंतु शहरातील शांतीनगर परिसरातील किडवाई नगर टीचर कॉलनी जवळ जुबेर शेठचा गाळा या ठिकाणी बनावट औषध इंजेक्शनची निर्मिती केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. शांतीनगर पोलिसांनी या ठिकाणी छापा मारून कारवाई केली असता त्याठिकाणी सैफूल माजीद सनफूई, अशिक लियाकत सरदार दोघे मूळ रा. पश्चिम बंगाल यांनी आपापसात संगनमताने विनापरवाना ‘ऑक्सिटोसिन’ या औषधाचे अवैधपणे व कोणताही औषधे व सौंदर्यप्रसाधने कायद्याद्वारे परवाना नसताना निर्मिती, साठवणूक, विक्री व वितरण करीत असल्याचे आढळून आले.
पोलिसांनी या ठिकाणाहून ७ लाख ५० हजार रुपये किमतीचे रसायन मिश्रण लिक्वीड जप्त केले असून दोन जणांना ताब्यात घेतले आहे. तर लियाकत शेठ हा फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत.
विशेष म्हणजे पोलिसांनी अटक केलेले दोन्ही आरोपी अशिक्षित असून देखिल ते या बनावट औषधांची निर्मिती करून औषध उत्पादक विक्रेते असल्याचे भासवून अवैधपणे ‘ऑक्सिटोसिन’ची विक्री करून समाजाची फसवणूक करीत असतानाच सदर इंजेक्शन प्राण्यांना टोचून त्यांना क्रुरतेची वागणूक देऊन अत्याचार केले जात होते.
याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे औषध निरीक्षक राजेश बनकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे औषध दिलेल्या गाई-म्हशींचे दूध बाजारात विक्री केले जात असून हे औषध दिलेल्या दुभत्या जनावरांचे मिळणारे दुध हे मानवी आरोग्यास हानीकारक आहे. अशा दुधाचे सेवन केल्याने आरोग्यावर दुष्परिणाम, श्रवण कमजोरी, दृष्टीहिनता, पोटाचे विकार, नवजात बाळाची कावीळ, गरोदर स्त्रीस रक्तस्राव, अनैसर्गिक गर्भपात, श्वसनाचे व त्वचेचे विकार असे गंभीर आजार होण्याची शक्यता आहे. सदरचे ‘ऑक्सिटोसिन’ हे हार्मोन असून त्याचा वापर प्रसुती सुरूळीत करण्यासाठी होत असून त्याच्या विक्रीसाठी वैद्यकीय अधिकारी यांच्या कडील प्रिसक्रिप्शन आवश्यक असते.
मुंबई : मुंबईच्या उत्तर भागातील विस्मृतीत गेलेल्या आणि अतिक्रमणांखाली दबलेल्या ११ तलावांना पुन्हा मोकळा श्वास…
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा 'फॅण्ड्री' (Fandry Movie) हा…
जलतरण शिकतानाच ११ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू; क्रीडा संकुल व्यवस्थापनावर गुन्हा दाखल भायंदर : उन्हाळी…
व्हॅटिकन सिटी : श्वसनाच्या आजाराने त्रस्त असलेल्या पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले.…
पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण…
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…