Thursday, March 20, 2025
Homeताज्या घडामोडीOxytocin : दूधही धोकादायक? दुभत्या गाई-म्हशींना दिल्या जाणा-या इंजेक्शनमुळे होताहेत जीवघेणे आजार!

Oxytocin : दूधही धोकादायक? दुभत्या गाई-म्हशींना दिल्या जाणा-या इंजेक्शनमुळे होताहेत जीवघेणे आजार!

आरोग्यावर होतात दुष्परिणाम, अनैसर्गिक गर्भपात, श्रवण कमजोरी, दृष्टीहिनता, पोटाचे विकार, नवजात बाळाची कावीळ, गरोदर स्त्रीस रक्तस्राव, श्वसनाचे व त्वचेचे विकार

भिवंडीत बनावट औषध कारखान्यावर पोलिसांची धाड

भिवंडी : तबेल्यातील म्हशींच्या कासरा मधून जास्त दूध मिळावे यासाठी दिल्या जाणा-या इंजेक्शनची (Oxytocin) बनावट निर्मिती करणा-या कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकून केलेल्या कारवाईत तब्बल साडेसात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत दोन आरोपींना अटक केली आहे तर एक जण फरार आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दुभत्या म्हशींना अधिक दुधासाठी ‘ऑक्सिटोसिन’ या औषधाचा वापर केला जातो. परंतु शहरातील शांतीनगर परिसरातील किडवाई नगर टीचर कॉलनी जवळ जुबेर शेठचा गाळा या ठिकाणी बनावट औषध इंजेक्शनची निर्मिती केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. शांतीनगर पोलिसांनी या ठिकाणी छापा मारून कारवाई केली असता त्याठिकाणी सैफूल माजीद सनफूई, अशिक लियाकत सरदार दोघे मूळ रा. पश्चिम बंगाल यांनी आपापसात संगनमताने विनापरवाना ‘ऑक्सिटोसिन’ या औषधाचे अवैधपणे व कोणताही औषधे व सौंदर्यप्रसाधने कायद्याद्वारे परवाना नसताना निर्मिती, साठवणूक, विक्री व वितरण करीत असल्याचे आढळून आले.

पोलिसांनी या ठिकाणाहून ७ लाख ५० हजार रुपये किमतीचे रसायन मिश्रण लिक्वीड जप्त केले असून दोन जणांना ताब्यात घेतले आहे. तर लियाकत शेठ हा फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत.

Rape on Puppy : कुत्र्याच्या पिलावर अत्याचार, नराधमाची जामिनावर सुटका

विशेष म्हणजे पोलिसांनी अटक केलेले दोन्ही आरोपी अशिक्षित असून देखिल ते या बनावट औषधांची निर्मिती करून औषध उत्पादक विक्रेते असल्याचे भासवून अवैधपणे ‘ऑक्सिटोसिन’ची विक्री करून समाजाची फसवणूक करीत असतानाच सदर इंजेक्शन प्राण्यांना टोचून त्यांना क्रुरतेची वागणूक देऊन अत्याचार केले जात होते.

याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे औषध निरीक्षक राजेश बनकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागरिकांच्या जीवाशी होतोय खेळ

हे औषध दिलेल्या गाई-म्हशींचे दूध बाजारात विक्री केले जात असून हे औषध दिलेल्या दुभत्या जनावरांचे मिळणारे दुध हे मानवी आरोग्यास हानीकारक आहे. अशा दुधाचे सेवन केल्याने आरोग्यावर दुष्परिणाम, श्रवण कमजोरी, दृष्टीहिनता, पोटाचे विकार, नवजात बाळाची कावीळ, गरोदर स्त्रीस रक्तस्राव, अनैसर्गिक गर्भपात, श्वसनाचे व त्वचेचे विकार असे गंभीर आजार होण्याची शक्यता आहे. सदरचे ‘ऑक्सिटोसिन’ हे हार्मोन असून त्याचा वापर प्रसुती सुरूळीत करण्यासाठी होत असून त्याच्या विक्रीसाठी वैद्यकीय अधिकारी यांच्या कडील प्रिसक्रिप्शन आवश्यक असते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -