Thursday, March 20, 2025
Homeताज्या घडामोडीChristmas : नाताळच्या सणानिमित्त काशिद-बिच पर्यटकांनी फुलला!

Christmas : नाताळच्या सणानिमित्त काशिद-बिच पर्यटकांनी फुलला!

नववर्षाच्या स्वागतासाठी मुरुड हाऊसफुल्ल

मुरुड : नाताळच्या सणानिमित्त ख्रिसमसच्या (Christmas) स्वागतासाठी नववर्षाच्या स्वागतासाठी मुरुड जंजिरा पाहण्यासाठी तुफान गर्दी होत आहे. पर्यटनात जगाच्या पटलावर नावारूपाला आलेल्या मुरुड तालुक्यातील काशिद-बिच (Kashid Beach) समुद्र किनारा पर्यटकांनी फुलला असून रस्त्यावर दुतर्फा वाहनांच्या लांबचलांब रांगा लागलेल्या दिसून येतात.

काशिद-बिच समुद्र किनारा भरतीच्या वेळेस फेसाळणारे पाणी, उसळणाऱ्या लाटा, किनाऱ्यावरील शुभ्र वाळू येथे पर्यटकांना आकर्षित करते.पर्यटकांच्या सोयी-सुविधात याठिकाणी असलेली स्पीडबोट, पॅरेसेलिंगबोट, बनाना, बंफर तसेच घोडा-उंटावरील सफर पर्यटनाचा आनंद द्विगुणीत करते.याठिकाणी विविध खाद्य-पेय चहा-नाष्टा सोयी सुविधा उपलब्ध आहेत. याठिकाणी दर शनिवार, रविवार तसेच सुटीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर पर्यटक भेट देत असतात.

अंगणवाडी सेविकांचा राज्य सरकारला विसर? लाडकी बहीण योजनेच्या परताव्यापासून अद्याप वंचित

रस्त्यावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. वेळप्रसंगी ट्रॅफिक जॅमलाही सामोरे जावे लागते. देश-विदेशातील पर्यटक देखील आवर्जून भेट देत असतात. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी लाईफ गार्ड, स्थानिक, स्टॉलधारक, ग्रामपंचायतचे सहकार्य लाभते. पोलीस ही आपली कामगिरी उत्तम प्रकारे पार पाडतात. ग्रामपंचायत तसेच डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, श्रीसदस्य, विविध सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून या ठिकाणी वेळोवेळी स्वच्छता अभियान राबविण्यात येत असल्याने समुद्र किनारा चकाचक करण्यात येत असतो.

आतापासूनच याठिकाणी पर्यटकांची मांदियाळी दिसून येते आहे. सरत्या २०२४ सालाला निरोप देण्यासाठी व सन २०२५ चे स्वागत करण्यासाठी काशिद-बिच समुद्र किनारा फुलला असून थर्टीफस्टसाठी लॉज बुकिंग फुल होऊ लागले आहेत. नववर्षाच्या स्वागतासाठी समुद्र किनारे पर्यटकांनी फुलले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -