सतीश वाघ यांच्या पत्नीला अटक
पुणे : भाजपा आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ (Satish Wagh) हत्या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. सतीश वाघ यांचे अपहरण केल्यानंतर त्यांचा मृतदेह आढळून आला होता. सतीश वाघ यांच्या हत्येची सुपारी त्यांच्या पत्नीनेच दिल्याचं आता तपासात उघड झालंय. प्रेम प्रकरणातून ही हत्या करण्यात आली असून सतीश वाघ यांच्या पत्नीला गुन्हे शाखेनं अटक केली आहे.
सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने वाघ यांच्या पत्नीला अटक केली आहे. सतीश वाघ यांचे अपहरण करून खून करण्यात आला होता. यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शिंदवणे घाटात सतीश वाघ यांचा मृतदेह आढळला होता. या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली होती.
PM SVAMITVA Yojana : महसूल मंत्र्यांची घोषणा, शुक्रवारपासून सुरू होणार स्वामित्व योजना
सतीश वाघ यांच्या हत्येमागे पत्नीचा हात असून प्रेमप्रकरणातून ही हत्या झाली असल्याची माहिती समोर आलीय. पत्नीच या हत्याकांडाची सूत्रधार असल्याचे समोर येताच पोलिसांच्या गुन्हे शाखेने सतीश वाघ यांच्या पत्नीला अटक केली आहे. वाघ यांच्या हत्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये तिघे वाघोलीत राहणारे आहेत. यात पवन श्यामसुंदर शर्मा, नवनाथ अर्जुन गुरसाळे आणि विकास सिताराम शिंदे यांचा समावेश आहे. तर अटक करण्यात आलेल्या इतर दोन आरोपींची नावे अक्षय हरीश जावळकर आणि अतिश जाधव अशी आहेत.