One Nation One Election : एक देश, एक निवडणूक विधेयकावर चर्चेसाठी संयुक्त संसदीय समितीची ८ जानेवारीला बैठक

नवी दिल्ली : एक देश, एक निवडणूक विधेयकावर चर्चा करण्यासाठी संयुक्त संसदीय समितीची पहिली बैठक आठ जानेवारी रोजी होणार आहे. या बैठकीत पुन्हा एकदा काँग्रेस आणि डावे पक्ष विधेयकाला विरोध करणार आहेत. काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी एक देश, एक निवडणूक विधेयकाला विरोध करण्याच्या भूमिकेवर काँग्रेस ठाम असल्याचे सांगितले. सरकारने लोकसभेत सादर केलेले एक देश, एक निवडणूक हे विधेयक देशाच्या संघराज्य संरचनेला बाधक असल्याचे डाव्या पक्षांचे म्हणणे आहे.


भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी - लेनिनवादी) लिबरेशन, क्रांतीकारी समाजवादी पक्ष, ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या सर्वांनी संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीत एक देश, एक निवडणूक विधेयकाला विरोध करणार असल्याचे जाहीर केले. देशाची संघराज्य संरचना सुरक्षित राहणे आवश्यक असल्याचीही भूमिका डाव्या पक्षांनी मांडली आहे. कोणतेही सरकार बहुमताच्या जोरावर संघराज्य संरचनेला बाधक असलेले निर्णय घेत असेल तर त्याला ठामपणे विरोध करणार असल्याचे डाव्या पक्षांनी जाहीर केले.



केंद्र सरकारने हिवाळी अधिवेशनात लोकसभेत एक देश, एक निवडणूक विधेयक सादर केले. हे विधेयक सभागृहाने बहुमताने संयुक्त संसदीय समितीकडे पाठवले. विधेयकावर चर्चा करण्यासाठी समितीची पहिली बैठक बुधवार आठ जानेवारी २०२५ रोजी होत आहे. संयुक्त संसदीय समितीत ३१ सदस्य आहेत. यात लोकसभेत २१ आणि राज्यसभेतील दहा सदस्यांचा समावेश आहे. समितीत काँग्रेसच्या प्रियांका गांधी वाड्रा आणि मनीष तिवारी, राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे, तृणमूल काँग्रेसचे कल्याण बॅनर्जी तसेच भाजपाचे पीपी चौधरी, बन्सुरी स्वराज, अनुराग ठाकूर हे प्रमुख सदस्य आहेत.


भारतात १९५१ - ५२, १९५७, १९६२ आणि १९६७ या वर्षी लोकसभा आणि विधानसभांसाठी देशात एकाचवेळी निवडणुका झाल्या होत्या. नंतर काही राज्यांच्या विधानसभा लवकर विसर्जित झाल्यामुळे निवडणुकांचे वेळापत्रक पुढे - मागे होण्यास सुरुवात झाली.आता केंद्र सरकार एक देश, एक निवडणूक विधेयकाद्वारे पुन्हा एकदा लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकाचवेळी घेण्यासाठी कायदा करण्यास उत्सुक आहे. या प्रकरणात पुढे काय होते याकडे अनेकांचे लक्ष आहे.

Comments
Add Comment

राहुल गांधींचा 'मतदारचोरी'चा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला; 'ऑनलाइन' मतदान वगळणे शक्य नाही

नवी दिल्ली: कर्नाटकच्या आळंद मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतदार वगळल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या

केरळमध्ये 'ब्रेन-इटिंग अमीबा'चा हाहाकार; १८ जणांचा बळी, ही लक्षणे दिसल्यास तातडीने व्हा सावधान!

नवी दिल्ली : केरळमध्ये पुन्हा एकदा 'ब्रेन-इटिंग अमीबा' (Brain-Eating Amoeba) चा धोका वाढला असून, या वर्षी या जीवघेण्या संसर्गाचे