Iqbal Kaskar : मी दाऊदचा भाऊ, माझं कोण वाकडं करणार, म्हणणा-या इकबाल कासकरला ईडीचा दणका!

ठाणे : मी दाऊदचा भाऊ, माझं कोण काय वाकडं करणार असं म्हणणा-या अंडरवर्ल्डचा कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकरला (Iqbal Kaskar) अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जोरदार दणका दिला आहे. इकबाल कासकरचा ईडीने जप्त केलेला ठाण्यातील फ्लॅट आता ईडीने ताब्यात घेतला आहे. ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाकडे २०१७ साली इकबाल कासकर विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. ही प्रॉपर्टी खंडणीच्या माध्यमातून बळकावण्यात आली होती. दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकर आणि त्यांच्या इतर साथीदारांवर मनी लॉन्ड्रींग प्रकरणात ईडीने कारवाई केली होती.


या कारवाईत ठाण्यातील घोडबंदर रोडवर असलेल्या कासकरच्या फ्लॅटवर ईडीने जप्ती आणली होती. तो फ्लॅट आता ईडीने ताब्यात घेतला आहे. याबाबतची नोटीस देखील इडीने फ्लॅटच्या दारावर लावली आहे. घोडबंदर येथील कावेसर मधील नियोपोलीस टॉवरमध्ये कासकरने हा फ्लॅट घेतला होता. याची किंमत ७५ लाख इतकी आहे. २०१७ साली इकबाल कासकरने हा फ्लॅट बिल्डर सुरेश मेहता आणि त्याची फर्म दर्शन इंटरप्रायजेसला धमकावून घेतला होता.



याबाबत ठाणे गुन्हे शाखा आणि खंडणी विरोधी शाखेत गुन्हा दाखल होता. खंडणी, धमकावणे, मनी लॉन्ड्रिंग आणि विविध गुन्ह्यांमध्ये इकबाल कासकर सध्या कारागृहात शिक्षा भोगत आहे. धक्कादायक बाब म्हणजे ईडीने कासकरचा जो फ्लॅट सील केलाय, त्यात कासकरच्या परिवाराने १५ दिवसांपूर्वी सील तोडून घरात प्रवेश केला होता, अशी माहिती इमारतीच्या सदस्यांनी दिली.


इकबाल कासकर आणि त्याचे सहकारी मुमताझ शेख आणि इसरार सईद यांनी अनेक व्यापा-यांना धमकावून त्यांच्याकडून पैसे जमा केले होते. तसेच त्यांची संपत्ती बळकावली होती. मुमताज शेखच्या नावावर प्रॉपर्टी करण्यासाठी बिल्डरवर दबाव टाकण्यात आला होता. खंडणीप्रकरणी तपास यंत्रणेने PMLA अंतर्गत आरोपपत्र दाखल केले आहे.

Comments
Add Comment

महापुरुषांची नावे संक्षिप्त घेणाऱ्यांवर कारवाई करा; शिवसेना नगरसेवकांची मागणी

मुंबई: मुंबई महापालिकेच्या वतीने जोगेश्वरी रुग्णालयाचे नामकरण हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब

महापालिका शाळांमधील न्युट्रीबार वादात; मध्यान्ह भोजनात इस्कॉनच्या खिचडीची झाली मागणी

मुंबई: मुंबई महापालिका शाळांमधील मुलांना पोषक आहारांतर्गत देण्यात येणाऱ्या न्युट्रीबारच्या वाटपाबाबत आता

मुंबईतील टँकर माफियांची लॉबी नष्ट करा; महापालिका सभागृहात सर्वच नगरसेवकांची एकमुखी मागणी

मुंबई: मुंबईत सध्या पाण्याची काही भागांमध्ये समस्या निर्माण झाली असून ही टंचाई फक्त आणि फक्त टँकर माफियांसाठी

मुंबईचा पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्ग पावसाळ्यापूर्वी समतल करा; उपमहापौरांची आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी

मुंबई: मुंबई महानगरातील रस्त्यांची स्थिती अधिक सुधारण्यासाठी पश्चिम व पूर्व द्रुतगती महामार्ग तसेच प्रमुख

महापालिकेच्यावतीने मुंबई क्लीन लीग स्पर्धा; स्वच्छता विषयक स्पर्धेच्या नोंदणीचा अक्षय कुमार यांच्या उपस्थितीत शुभारंभ

मुंबई: मुंबई अधिक स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याच्या अनुषंगाने, महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने

मुंबई वॉटर मेट्रो जलवाहतूक प्रकल्पाला गती देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

मुंबई : "मुंबई महानगर प्रदेशात जलप्रवासी वाहतुकीसाठी वॉटर मेट्रो प्रकल्प तीन टप्प्यात कार्यान्वित करण्यात