Health Tips: थंडीच्या दिवसांत पाणी कमी पिताय? शरीरामध्ये दिसतात ही लक्षणे

मुंबई: प्रत्येक मोसमात लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलतात. थंडी येताच बरेचजण गरम पदार्थ खाण्यास सुरूवात करतात. चहा-कॉफीचे सेवन अधिक करू लागतात. तसेच पाण्याचे सेवन मात्र कमी होते. थंडीच्या दिवसांत तहान कमी लागते. याच कारणामुळे लोक आपल्या लिक्विड डाएटवर लक्ष देत नाहीत. थंडीच्या दिवसांत तहान कमी लागते याचा अर्थ शरीराला पाण्याची गरज नाही असे नाही तर या दिवसांतही शरीराला पाण्याची गरज असते. शरीरात पाण्याची कमतरता झाल्यास मेंदूच्या कोशिका आकुंचन पावू लागतात. यामुळे विचार करण्याच्या क्षमतेवरही परिणाम होतो.



ही दिसतात लक्षणे


कोरडी त्वचा: थंडीच्या दिवसांत पाणी कमी प्यायल्यास त्वचा कोरडी होऊ लागते. थंडीत त्वचा कोरडी होणे सामान्य बाब आहे. मात्र असे अनेकदा होते की त्वचेवर खपलीसारखी होते. हे मात्र पाणी कमी असण्याचे लक्षण आहे. जे लोक दीर्घकाळापासून पाणी कमी पितात त्यांची त्वचा रूक्ष असतात. थंडीच्या दिवसांत ही समस्या अधिक वाढते.


लघवी पिवळी होणे - जर लघवीचा रंग पिवळा असेल, कमी होत असेल अथवा लघवीजवळ जळजळ होत असेल तर समजून जा की शरीरात पाण्याची कमतरता आहे. कमी पाणी प्यायल्याने लगेचच लघवीवर परिणाम होतो.


तोंड सुकणे - जर तुमचे ओठ खूप कोरडे पडत असतील. सतत सुकत असतील अथवा घसा सुकत असेल तर तुम्हाला पाण्याची कमतरता जाणवते. जर तोंड सतत सुकत असेल तर समजून जा की शरीरात पाण्याची कमतरता आहे.


हृदयाकडे जडपणा - दीर्घकाळापासून तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता असेल तर रक्ताच्या प्रमाणावरही परिणााम होतो. अशातच हृदयाला रक्ताचा पुरवठा करण्यासाठी अधिक मेहनत करावी लागते. यामुळे हृदयावर जोर पडतो.

Comments
Add Comment

Shravan : श्रावणात मांसाहार का करीत नाहीत? केवळ धार्मिक कारण की आणखी काही, आयुर्वेदाचे नियम काय सांगतात?

श्रावण महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो. या दरम्यान भगवान शंकराची पूजा केली जाते. या काळात

नाचणीची भाकरी रोज खाणे योग्य आहे का? कॅलरी, प्रोटीन आणि फायद्यांची माहिती

नाचणीला सुपरफूड मानले जाते, कारण ते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, रक्तातील साखर (शुगर) नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि

अन्नाची अॅलर्जी : असहिष्णुता की संवेदनशीलता?

अनेकांना एखादा अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर शिंका येणे, श्वास घेताना घरघर होणे, अंगावर पुरळ उठणे, पोट फुगणे, जुलाब,

EAR CARE : कान स्वच्छ करताना बाळगा विशेष काळजी; टोकदार वस्तूंचा वापर ठरू शकतो घातक, तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा

शरीराची स्वच्छता राखणे जितके महत्त्वाचे आहे, तितकीच कानांची काळजी घेणे देखील अत्यंत गरजेचे असते. मात्र, कानातील

Health Care : पावसाळा आणि आरोग्याची काळजी; आरओ की उकळलेले पाणी? कोणते पिणे योग्य?

पावसाळा सुरू झाला की वातावरणात बदल होतो आणि साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागतो. या दिवसांत दूषित

Viral Cocktail : पावसाळ्यात 'व्हायरल कॉकटेल'चा धोका; कोविड, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए'ची लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष

मुंबई: पावसाळ्याच्या वातावरणात कोविड-१९, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए' हे तिन्ही विषाणू एकाच वेळी सक्रिय झाल्यामुळे