Thursday, March 27, 2025
Homeसाप्ताहिकअर्थविश्वStock Market : अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर बाजार सुरू राहणार

Stock Market : अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर बाजार सुरू राहणार

मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्पाच्या दिवशी (Budget Day) १ फेब्रुवारी २०२५ रोजी शेअर बाजार (Stock Market) सुरू राहणार आहे. भारतीय शेअर बाजार (Share Market) निर्देशांक (एनएसई) आणि मुंबई शेअर बाजार निर्देशांक (बीएसई) नियमीत वेळेनुसार सुरू राहणार आहेत. साधारणतः शनिवारी आणि रविवारी शेअर बाजार बंद राहतात. परंतु, अर्थसंकल्पाच्या दिवशी शनिवार असूनही बाजार नियमित वेळेनुसार लाईव्ह ट्रेडिंग सत्र करणार आहेत. अर्थसंकल्पातील घोषणांवर गुंतवणूकदारांकडून वेळेवर प्रतिसाद मिळणे, हा यामागील उद्देश आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी २०२५ रोजी २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. अर्थमंत्री म्हणून सीतारामन यांचे हे सलग आठव्यांदा अर्थसंकल्प सादरीकरण असेल. अर्थमंत्री आणि त्यांच्या टीमने अर्थसंकल्प २०२५ची तयारी सुरु केली आहे.

Rahul Gandhi vs Devendra Fadnavis : राहुल गांधी केवळ राजकीय हेतूने आले, जाती-जातींमध्ये द्वेष निर्माण करणे, हेच राहुल गांधींचे ध्येय

यासंदर्भात एक्सचेंजने जारी केलेल्या परिपत्रकानुसार केंद्रीय अर्थसंकल्पाच्या सादरीकरणाच्या दिवशी १ फेब्रुवारी २०२५ रोजी थेट ट्रेडिंग सत्र आयोजित केले जाईल. सेटलमेंटच्या सुट्टीमुळे १ फेब्रुवारी २०२५ रोजी ‘टीओ’ सत्र ट्रेडिंगसाठी शेड्यूल केले जाणार नसल्याचे एनएसईने नमूद केले आहे.

इक्विटी मार्केटमध्ये दुपारी ३.३० वाजेपर्यंत नियमित ट्रेडिंग सत्र असणार आहे. तर कमोडिटी डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सत्र असेल.

यापूर्वी देखील अशा हाय- इम्पॅक्ट इव्हेंटच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजार खुला ठेवण्यात आला होता. उल्लेखनीय बाब म्हणजे, २०२० आणि २०१५ मध्ये देखील शनिवारी अर्थसंकल्प सादर झाला होता आणि तेव्हा देखील ट्रेडिंग सत्र आयोजित करण्यात आले होते.

अर्थसंकल्पाचा दिवस हा शेअर बाजारासाठीदेखील महत्त्वाचा मानला जातो. कारण केंद्रीय अर्थसंकल्पातून सरकारची आर्थिक धोरणे, कर आकारणी आणि क्षेत्रनिहाय निधीच्या वाटपाची रूपरेषा जाहीर केली जाते. याचा उद्योग आणि गुंतवणूकदारांच्या भावनांवर लक्षणीय परिणाम होऊ शकतो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -