मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर भुजबळ दिल्लीला रवाना

मुंबई : राज्य मंत्रिमंडळात वर्णी न लागल्याने नाराज असलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज, सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या भेटींनंतर भुजबळांनी पत्रकार परिषद घेत आपली पुढची भूमिका स्पष्ट केली आहे. छगन भुजबळ आणि समीर भुजबळ आज,सोमवारी सकाळी १०.३० वाजता मुंबईतील सागर यावेळी त्यांनी सुमारे ४० मिनीटे मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. या भेटीत नेमकी कुठल्या विषयांवर चर्चा याची माहिती छगन भुजबळ यांनी माध्यमांनी दिली आहे. छगन भुजबळ म्हणाले की, मी आणि समीर भुजबळ आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांच्याबरोबर अनेक गोष्टींवर चर्चा झाली.



सामाजिक, राजकीय मुद्यांवर बोललो. काय काय घडले, काय चालू आहे. त्याबाबत चर्चा झाली. हे आपण मान्यच करायला हवे. की जो महाविजय मिळाला आहे. त्यामागे ओबीसींचे पाठबळ मोठ्या प्रमाणावर राहिले आहे. त्याचाही वाटा आहे. इतर गोष्टींचा वाटा आहे. ओबीसींनी महायुतीला आशीर्वाद दिला. त्याबद्दल त्यांचे आभार मानले पाहिजे. ओबीसींचे नुकसान फडणवीस होऊ देणार नाही. पण आता जे काही राज्यात सुरू आहे. येत्या ८ ते १० दिवसात आपण पुन्हा भेटू आणि एक चांगलामार्ग शोधून काढू, असे फडणवीस म्हणाले. तसेच मला विनंती आहे की, ओबीसी नेत्यांना सांगा. मी साधकबाधक विचार करत आहे.



हा निरोप ओबीसी आणि ओबीसींना पाठबळ देणाऱ्या घटकांना द्या, असे फडणवीस म्हणाल्याचे भुजबळांनी सांगितले. दरम्यान भाजप प्रवेशावर भुजबळांनी स्पष्ट बोलण्याचे टाळले. त्यानंतर ते दिल्लीला रवाना झाले. दिल्लीत जाऊन कुणाला भेटणार, दिल्लीवारीचे प्रयोजन काय याबाबत गोपनियता पाळण्यात आलीय.

Comments
Add Comment

मुंबई विमानतळावर ७९ कोटींचे कोकेन जप्त

मुंबई : डीआरआय मुंबईने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ७९ कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले असून या प्रकरणी दोन

नवी मुंबई विमानतळाचे 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आगामी 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

'नाशिकच्या नव्या रिंग रोड आणि साधूग्रामचे काम लवकर पूर्ण करा'

मुंबई : कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ

'राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार'

मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल

ओबीसी महामोर्चा दहा ऑक्टोबरलाच होणार

मुंबई (प्रतिनिधी) : सरकारने सकल ओबीसी संघटनांच्या या मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने १० ऑक्टोबर रोजी

फास्ट टॅग नसला तरीही नाही भरावा लागणार दुप्पट टोल

मुंबई (प्रतिनिधी) : फास्टटॅग नियमांमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. १५ नोव्हेंबरपासून, जर तुमच्या वाहनात वैध