Friday, March 28, 2025
Homeब्रेकिंग न्यूजNitesh Rane : मंत्री नितेश राणे यांचे सिंधुदुर्गात जल्लोषी स्वागत!

Nitesh Rane : मंत्री नितेश राणे यांचे सिंधुदुर्गात जल्लोषी स्वागत!

५१ जेसीबी,२ क्रेन च्या माध्यमातून मंत्री नितेश राणे यांच्यावर केली पुष्पवृष्टी

सिंधुदुर्ग : तब्बल ५१ जेसीबी आणि २ क्रेनच्या माध्यमातून पुष्पहार व फुलांचा वर्षाव करत राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांचे सिंधुदुर्गच्या (Sindhudurg) प्रवेशद्वारावर खारेपाटण येथे भव्य दिव्य स्वागत करण्यात आले. राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी (state cabinet minister) निवड झाल्यानंतर ना. नितेश राणे हे प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह होता. दरम्यान जिल्ह्याच्या विविध भागात जनतेने ना. नितेश राणे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देत,नितेश राणे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है..,जय श्रीराम,भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा जोरदार घोषणाबाजीने कार्यकर्त्यांनी परिसर दुमदुमून सोडला.

मंत्री नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले. त्यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर खारेपाटण येथे भव्य स्वागत करण्यात आले.यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,माजी आ.अजित गोगटे,जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते व महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भव्य दिव्य स्वागत

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात प्रथमच एवढे भव्यदिव्य स्वागत अनुभवण्याचा मान ना.नितेश राणे यांना प्राप्त झाला. खारेपाटण येथे मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक यांनी सकाळपासून हजेरी लावली होती.मोठ्या क्रेनच्या माध्यमातून भव्य पुष्पहार ठेवण्यात आले होते. पुष्पवृष्टी करण्यासाठी तब्बल ५१ जेसीबी सज्ज झाले होते. मंत्री नितेश राणे यांचे खारेपाटण येथे आगमन झाल्यानंतर जोरदारपणे घोषणाबाजी करत आणि फटाक्यांची आतीषबाजी करत, ढोल पथकांच्या वाद्यावर स्वागत करण्यात आले. यावेळी रथावर स्वार होत मंत्री नितेश राणे हे मुख्य मंचकाच्यादिशेने जात असताना ५१ जेसीबीच्या माध्यमातुन पुष्पवृष्टी करण्यात आल्याने संपुर्ण वातावरण भारावुन गेले होते. एखाद्या राजकीय नेत्याची एवढ्या भव्य-दिव्य पद्धतीने स्वागत होण्याची ही पहिलीच वेळ असल्याच्या प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

शासकीय स्वागत

ना. नितेश राणे राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणुन प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होत असल्याने शासकीय रिवाजानुसार खारेपाटण येथे प्रथम कणकवलीचे तहसिलदार दिक्षांत देशपांडे तसेच कणकवली पोलीस निरिक्षक मारुती जगताप यांनी ना. नितेश राणे यांचे स्वागत केले.

ना. नितेश राणे हे राजापुर येथे हेलीकॉप्टरने दाखल झाले. यावेळी राजापुर विधानसभा मतदार संघाचे आमदार किरण सामंत यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष, संदेश उर्फ गोट्या सावंत, विधानसभा अध्यक्ष मनोज रावराणे, कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समिर नलावडे यांच्यासह संदिप मेस्त्री, मिलिंद मेस्त्री व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी गाड्यांचा मोठा ताफा तैनात होता. राजापुर येथे स्वागत स्विकारल्यानंतर ना. नितेश राणे हे खारेपाटण येथे दाखल झाले.
बॉक्स

ना. नितेश राणेंच्या स्वागताचे भव्यदिव्य नियोजन

मत्स्य व बंदर विकास मंत्री ना. नितेश राणे मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच सिंधुदुर्गात दाखल होणार असल्याने खारेपाटण येथे भव्यदिव्य स्वागताचे नियोजन विधानसभा अध्यक्ष मनोज रावराणे, कलाकार मानधन समितीचे अध्यक्ष संतोष कानडे, कणकवली तालुका तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर,संजय देसाई,बाळा जठार यांच्यासह त्यांच्या सहकार्यांनी केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -