मुंबई: थंडीचे दिवस सुरू झालेत त्यासोबतच केसगळतीही मोठ्या प्रमाणात होत आहे. येथे आम्ही काही तुम्हाला उपाय सांगत आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही केस गळण्यापासून रोखू शकतो आणि चमकदार बनवू शकता. जसजशी थंडी वाढू लागते तसतशा अनेक समस्या निर्माण होऊ लागतात. यामुळे त्वचा कोरडी होणे, रॅशेस आणि सगळ्यात मोठी समस्या केस गळतीची होते.
थंड हवा आणि घराच्या आत हीटिंगमुळे केसांचे आरोग्य बिघडते. यामुळे ते निस्तेज होतात तसेच गळू लागतात. दरम्यान, थंडीच्या दिवसांत जर तुमचे केस गळत असतील तर काही जुने उपाय वापरून तुम्ही केसगळती रोखू शकता.
आवळ्याचा रस हा अनेक औषधीय गुणांसाठी ओळखला जातो. आवळ्याच्या रसामुळे तुमचे केस धुतल्यानंतर मुलायम आणि चमकदार होतात.
केसांची वाढ होण्यासाठी तुम्ही बदामाचे तेल आणि आवळ्याचा रस वापरू शकता. एका वाटीत थोडे बदामाचे तेल गरम करा आणि त्यात आवळ्याचा रस मिसळा.
हे मिश्रण स्काल्पवर गोलाकार पद्धतीने हळूहळू मालिश करा. यामुळे केसांच्या मुळांकडे व्यवस्थित लागेल. धुण्याच्या आधी १-२ तास हे मिश्रण लावा.
जर तुमचे केस निस्तेज झाले असतील तर ते सांभाळणे कठीण होते. यासाठी कोरफडीचे जेल वापरू शकता. नारळाच्या तेलामुळेही केसांना चांगले कंडिशनिंग मिळते. तसेच केस मजबूत होण्यास मदत होते.