मालमत्ता कर संकलन केंद्रे सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार

ठाणे : सन 2024-25 या आर्थिक वर्षाची मालमत्ता कर वसुलीची कार्यवाही अंतिम टप्प्यात सुरू आहे. या अनुषंगाने ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील जे करदाते/ नागरिक त्यांचा मालमत्ता कर प्रत्यक्ष प्रभाग कार्यालयात येऊन भरतात अशा करदात्यांना सोईचे व्हावे या करिता ठाणे महापालिकेची सर्व कर संकलन केंद्रे सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार आहेत. ज्या करदात्यांनी आपला मालमत्ता कर अद्याप जमा केलेला नसल्यास मालमत्ता करवसुली अंतर्गतची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून आपला मालमत्ता कर भरुन महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.




ठाणे महानगरपालिकेची सर्व प्रभाग व उप प्रभाग स्तरावरील सर्व कर संकलन केंद्रे व प्रभाग स्तरावरील कर वसुली कार्यालये तसेच महापालिका प्रशासकीय भवनातील मुख्य करवसुली कार्यालय व नागरी सुविधा केंद्रातील कर संकलन केंद्र दि. 01.12.2024 ते 31.12.2024 या कालावधीतील सर्व शनिवार सकाळी 10.30 ते सायं. 4.30 वाजेपर्यत तसेच दि. 01.01.2025 ते ‍31.03.2025 या कालावधीमधील सर्व शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी (दि. 14 मार्च 2025 रोजी धुलीवंदन असल्याने हा दिवस वगळून ) सकाळी 10.30 ते सायं. 4.30 आणि तसेच सर्व रविवार सकाळी 10.30 ते दुपारी 1.30 या वेळेत कर संकलनासाठी कार्यान्वित राहणार आहेत.

महापालिकेच्या www.thanecity.gov.in या संकेतस्थळावरुन Payment Gateway द्वारे ऑनलाईन पध्दतीने मालमत्ता कर जमा करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम, भीम ॲप द्वारे देखील करदाते मालमत्ता कर सुलभतेने जमा करु शकतील. तरी नागरिकांनी आपला मालमत्ता कर भरण्यासाठी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

CJP : सीजेपी आंदोलनकाळात महाराष्ट्रात दाखल गुन्हे रद्द होणार

मुंबई : वैद्यकीय प्रवेश परीक्षा 'नीट'मधील अनियमिततेविरोधात आणि कॉकरोच जनता पार्टीच्या (सीजेपी) समर्थनार्थ

  Quick Breakfast Recipes : फक्त १५ मिनिटांत तयार होणारे ८ झटपट नाश्त्याचे पदार्थ

सकाळी उठल्यानंतर आपल्याला खूप भूक लागलेली असते. (Easy & Quick Snack Recipes For Breakfast). यातच सकाळी सकाळी ऑफिसला जाण्याची घाईगडबड तसेच

AAFA 2026 : अल्लू अर्जुन ने जिंकली चाहत्यांची मने; भारतीय संस्कृती जपत काढली पादत्राणे

अल्लू अर्जुन आज देशातील सर्वात मोठ्या पॅन-इंडिया सुपरस्टार्सपैकी एक आहेत. पुष्पा फ्रँचायझीच्या अभूतपूर्व

High Protein Fruits : कोणत्या फळात किती प्रोटीन? रोजच्या आहारात फळांचा समावेश कसा करावा?

रोजच्या आहारातील प्रथिनांचे प्रमाण वाढवण्यासाठी अनेक जण "हाय-प्रोटीन फळे" शोधण्याचा प्रयत्न करतात. फळे ही

Guru Purnima : गुरुपौर्णिमा नेमकी कधी ? जाणून घ्या गुरुपौर्णिमेचे महत्त्व

मुंबई : हिंदू धर्मामध्ये गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. आपल्या गुरुबद्दल असलेला आदर, कृतज्ञता व्यक्त

Solo Trip : सोलो ट्रीपला जाण्याचा प्लॅन करताय ? मग या ठिकाणांचा नक्की विचार करा

मुंबई : एकट्याने प्रवास करण्याचा ट्रेंड दिवसेंदिवस वाढत आहे. सोलो ट्रिपमुळे (Solo Trip) नवीन ठिकाणं अनुभवता येतात,