मुंबई : काही आठवड्यांपासून राज्यभरात थंडीचा जोर चांगलाच वाढला आहे. या थंडीतच अंडी खाणाऱ्यांची मागणी मोठ्या प्रमाणात असते. परंतु आता अंडी खाणाऱ्या खवय्यांसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. (Egg Price Hike)
Tamhini Ghat Accident : ताम्हिणी घाटात प्रवाशांनी खचाखच भरलेली बस उलटली!
दीड महिन्यांपूर्वी किरकोळ बाजारात ३० अंडी १६० रुपयांच्या दरात मिळत होती. मात्र, आता हा दर १९० रुपयांवर पोहचला आहे. तर ६ रुपयांना मिळणारे एक अंडे आता ८ रुपयांना विकले जात आहे. तसेच, ७२ रुपयांना मिळणारी डझन अंडी आता तब्बल ९६ रुपयांना विकली जात आहेत. प्रती अंड्यामागे दोन रुपयांची वाढ झाली असली तरीही सर्वसामान्यांच्या खिशाला काहीसा फटका बसणार आहे. (Egg Price Hike)