नागपूर : ताम्हिणी घाटातील बस दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी विधानसभेत सांगितले.
पुणे येथून महाडकडे जाणाऱ्या बसला ताम्हिणी घाटात अपघात झाला. ही दुर्घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
ही बस पुणे येथून महाडच्या दिशेने जात होती. यावेळेस ताम्हिणी घाटातील धोकादायक वळणावर हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की ५ जणांचा जागीच मृत्यू झाला तर २५ जण जखमी झाले. जखमींना तातडीने माणगाव रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.
लग्नासाठी ही बस पुणे येथून महाडच्या दिशेने जात असताना ही दुर्देवी घटना घडली. यात ४०हून अधिक प्रवासी प्रवास करत होते. या अपघाताचे वृत्त कळताच माणगाव पोलीस निरीक्षकांनी टीमसह घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.
लग्नासाठी जाधव कुटुंब महाडला जात होते. यावेळेस ताम्हिणी घाटात वॉटरफॉल पॉईंटजवळ बस ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडली. यात गाडी एका बाजूला पलटी झाली. त्यात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. यात २ पुरुष आणि ३ महिलांचा समावेश आहे.