Sudhir Rasal : ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

मुंबई : प्रतिष्ठेचा समजला जाणाऱ्या साहित्य अकादमी पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. साहित्य अकादमीने २० भाषांमध्ये वार्षिक साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये मराठीत ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.


साहित्य अकादमीने २१ भाषांमध्ये ८ काव्यंसग्रह, तीन कादंबरी, २ लघुकथा संग्रह, ३ साहित्य समीक्षक, १ नाटक आणि एक संशोधनासाठी पुरस्कार दिला. साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्याला सन्मानचिन्ह, शाल आणि एक लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाते. ८ मार्च २०२५ रोजी दिल्लीत हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.



विविध भाषांमधील साहित्य पुरस्कार जाहीर


आसामी भाषेत समीर तांती, बोडो-अरोन राजा, इंग्लिश -इस्टरिन किर, गुजराती - दिलीप झवेरी, हिंदी - गगन गिल, कन्नड-केव्ही नारायणा, काश्मिरी-सोहन कौल, कोंकणी-मुकेश थाली, मैथिली - महेंद्र मलांगिया, मल्याळम - जयकुमार, मणिपूरी - हाओबम सत्यवती देवी, मराठी-सुधीर रसाळ, नेपाळी - युवा बराल.



कोण आहेत सुधीर रसाळ...


डॉक्टर सुधीर रसाळ यांना विंदांचे गद्यरूप या समीक्षणात्मक पुस्तकासाठी यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. सुधीर रसाळ हे सध्या ९१ वर्षांचे असून या वयातही अलीकडेच त्यांच्या १६ व्या पुस्तकाचे प्रकाशन पार पडले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मराठी विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी काम केले आहे. तसेच प्राध्यापक म्हणूनही त्यांची चांगली ओळख आहे. त्यांनी शासकीय कला महाविद्यालय आणि मराठवाडा विद्यापीठात मराठीचे प्राध्यापक म्हणून काम केले.

Comments
Add Comment

वर्धा शहरातील रामनगर येथील भूखंड मालकी हक्काने देण्यास मंजुरी

मुंबई : वर्धा नगरपरिषदेच्या मालकीचे रामनगरमधील भाडेपट्ट्याने दिलेले भूखंड कायमस्वरूपी मालकी हक्काने करून

श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी शताब्दी समागम कार्यक्रमासाठी ९५.३५ कोटींची तरतूद

मुंबई : शिख धर्माचे नववे गुरू आणि ‘हिंद-की-चादर’ म्हणून ओळखले जाणारे श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी

मच्छिमारांना कर्जावर चार टक्के व्याज सवलत

मुंबई : राज्यातील मच्छिमार, मत्स्यकास्तकार, मत्स्यउत्पादकांसह किसान क्रेडिट कार्डधारक मत्स्यव्यावसायिकांना २

सोलापूरच्या असंघटित कामगारांच्या ३० हजार घरांचा मार्ग मोकळा

मुंबई : सोलापूर येथील असंघटित कामगारांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मौजे कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर)

नागपूरच्या लक्ष्मी नारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठास सात कोटी रुपयांचा निधी

मुंबई : नागपूर येथील लक्ष्मी नारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेस जीव रसायनशास्त्र, सूक्ष्म जीवशास्त्र

Breaking News : राज्यात निवडणुकीचे बिगुल वाजले; २ डिसेंबरला होणार मतदान

राज्यात आचारसंहिता लागू २४६ नगरपरिषद, ४२ नगरपंचायतींसाठी होणार मतदान २ डिसेंबरला मतदान, ३