कॅनबेरा : ब्रिस्बेन येथील गाबाच्या मैदानात रंगलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील भारतीय संघाचा पहिला डाव २६० धावांवर आटोपल्यावर ऑस्ट्रेलियानं आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली. आणि अखेरच्या म्हणजेच पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघानं टीम इंडियासमोर २७५ धावांचे टार्गेट सेट केले आहे.या अअखेरच्या दिवशी भारतीय संघासाठी जवळपास ५४ षटकांचा खेळ बाकी आहे.
भारतीय संघाचा पहिला डाव २६० धावांवर आटोपल्यावर ऑस्ट्रेलियानं आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली. १८ षटकांच्या खेळात ७ बाद ८९ धावा करत ऑस्ट्रेलियन कॅप्टन पॅट कमिन्स याने दुसरा डाव घोषित केला. पहिल्या डावातील १८५ धावांची आघाडी आणि दुसऱ्या डावात केलेल्या ८९ धावांसह यजमान संघानं २७४ धावांची आघाडी घेतली.ऑस्ट्रेलियाकडून कॅप्टन पॅट कमिन्स याने संघाचे टार्गेट सेट करण्याचे इरादे स्पष्ट करणारी खेळी केली. १० चेंडूत त्याने २ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने २२ धावा केल्या. ही ऑस्ट्रेलियन संघाकडून दुसऱ्या डावातील सर्वोच्च धावसंख्या ठरली. त्याच्याशिवाय एलेक्स कॅरीनं २० चेंडूत २ चौकाराच्या मदतीने २० धावा केल्या. या दोघांशिवाय ट्रॅविस हेडनं १९ चेंडूत १७ धावांचं योगदान दिले.आघाडीच्या पाच फलंदाजांना दुहेरी आक़डाही गाठता आला नाही. ट्रॅविस हेडनं दुहेरी आकडा पार केला. पण तो यावेळी टीम इंडियासाठी काही डोकेदुखी ठरला नाही.
Innings Break!
Australia have declared after posting 89/7 in the 2nd innings.#TeamIndia need 275 runs to win the 3rd Test
Scorecard – https://t.co/dcdiT9NAoa#AUSvIND pic.twitter.com/bBCu6G0pN5
— BCCI (@BCCI) December 18, 2024
जसप्रीत बुमराह या मालिकेत पहिल्यापासून कमालीची कामगिरी करताना दिसत आहे. पहिल्या डावात ६ विकेट्स घेणाऱ्या जसप्रीत बुमराहनं दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाच्या तीन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. याशिवाय मोहम्मद सिराज आणि आकाशदीप यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या. तिसऱ्या कसोटी सामन्यातील अखेरच्या आणि पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघानं टीम इंडियासमोर २७५ धावांचे टार्गेट सेट केले आहे.यांनतर आता भारतीय संघासाठी जवळपास ५४ षटकांचा खेळ उरला आहे. त्यामुळे आता भारतीय संघ कोणत्या अप्रोचसह खेळणार ते पाहण्याजोगे असेल.