Thursday, March 27, 2025
Homeदेशगेल्या ३ वर्षात देशाचा सरासरी जीडीपी ८.३ टक्के - अर्थमंत्री

गेल्या ३ वर्षात देशाचा सरासरी जीडीपी ८.३ टक्के – अर्थमंत्री

नवी दिल्ली : गेल्यी ३ वर्षात भारताचा सरासरी जीडीपी ८.३ टक्के होता अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. लोकसभेत आज, मंगळवारी देशाच्या व्यापक कामगिरीचा आढावा सादर करताना त्या बोलत होत्या.

यावेळी देशातील नियंत्रित महागाई, शाश्वत जीडीपी वाढ आणि उत्पादन क्षेत्रातील लवचिकता या मुद्द्यांवर भर देताना सीतारामन म्हणाल्या की, गेल्या ३ वर्षांत भारताचा जीडीपी सरासरी ८.३ टक्के होता, तो स्थिर आणि शाश्वत वाढ दर्शवत आहे. दुसऱ्या तिमाहीत जीडीपी अपेक्षेहून कमी म्हणजे ५.४ टक्के असल्याचे त्यांनी मान्य केले. हा प्रकार म्हणजे तात्पुरते अपयश असल्याचे सातारामन म्हणाल्यात. तसेच येत्या तिमाहीत अर्थव्यवस्थेत निरोगी वाढ दिसून येईल, अशी ग्वाही सीतारामन यांनी दिली.

विरोधी पक्षाकडून केलेल्या सामान्य मंदीच्या दाव्यांचे खंडन करताना, सीतारामन म्हणाल्या की, अर्ध्या उत्पादन क्षेत्रांमध्ये मजबूत वाढ दिसून येत आहे. त्यांनी आश्वासन दिले की काही क्षेत्रांमध्ये झालेली घसरण औद्योगिक क्रियाकलापांमध्ये व्यापक मंदीचे संकेत देत नाही, परिस्थिती सुधारत असताना या क्षेत्राची पुन्हा उभारी घेण्याची क्षमता पुन्हा दर्शवत, असल्याचेही त्यांनी सांगितले. एनडीए सरकार सत्तेत आल्यापासून सरकारने आर्थिक निर्देशांक स्थिर करण्यावर प्रमुख लक्ष केंद्रित केले आहे. यूपीए राजवटीत आर्थिक निर्देशांक दुहेरी अंकी वाढ झालेली किरकोळ महागाई सध्याच्या प्रशासनात आटोक्यात आणण्यात आली आहे.

समावेशक विकास सुनिश्चित करण्यासाठी सरकारने उज्ज्वला योजनेसारख्या सामाजिक कल्याणकारी कार्यक्रमांना देखील प्राधान्य दिले आहे. जागतिक अडचणी आणि देशांतर्गत समायोजनांमुळे निर्माण झालेल्या आव्हानांना न जुमानता, जीडीपी वाढ मजबूत राहिली आहे, धोरणात्मक सुधारणा आणि शाश्वत धोरणात्मक हस्तक्षेपांमुळे ती बळकट झाल्याचे देखील अर्थमंत्र्यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -