Pushpa 2 On OTT : ‘पुष्पा 2’ आता OTTवर रिलीज होणार

Share

मुंबई : अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांचा ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटाने जवळपास सर्व भारतीय चित्रपटांना मागे टाकले आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. पुष्पा २ नं आपल्या दमदार यशानं भारतातील अनेक मोठमोठ्या आणि दिग्गजांच्या सिनेमांचे रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.’पुष्पा २’ने आतापर्यंत जगभरात ११०० कोटींहून अधिक कमाई केली आहे.

१० दिवस उलटले तरी अल्लू अर्जुनच्या चित्रपटाची कमाई कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. थिएटरनंतर आता अभिनेत्याच्या चाहत्यांसह बरेच लोक OTT वर पुष्पा २च्या रिलीजची वाट पाहत आहेत. अशा परिस्थितीत या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे.

https://prahaar.in/2024/12/17/19-students-affected-by-air-leak-at-jindal-company-shifted-back-to-hospital/

‘पुष्पा २’ चित्रपट ५ डिसेंबरला रिलीज झाला आहे. आता चाहत्यांना चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची उत्सुकता लागली आहे. ‘पुष्पा २’ चित्रपटाचे ओटीटी राइट्स नेटफ्लिक्सने विकत घेतले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, नेटफ्लिक्सने २७५ कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीत ‘पुष्पा २’ चित्रपटाचे ओटीटी राइट्स विकत घेतले आहेत. सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांनुसार,अल्लू अर्जुनचा पुष्पा २ पुढील वर्षी म्हणजे २०२५ मध्ये ९ जानेवारी रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या ओटीटी रिलीजमध्ये तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि हिंदी या भाषांचा समावेश आहे.मात्र चित्रपट निर्मात्यांकडून अद्याप अधिकृतरित्या ओटीटी रिलीज संदर्भात कोणतीही घोषणा झालेली नाही. सहसा, कोणताही चित्रपट चित्रपटगृहांनंतर OTT वर प्रदर्शित होण्यासाठी ४० ते ५० दिवस लागतात.मात्र हा चित्रपट रिलीजच्या आठ ते दहा आठवड्यांनंतर ओटीटीवर रिलीज होऊ शकतो. असे बोले जात आहे. त्यामुळे ‘पुष्पा २’ हा ॲक्शन चित्रपट २०२५ मध्ये तुम्हाला ओटीटीवर पाहता येणार आहे.

अल्लू अर्जुन पुन्हा एकदा सुकुमार दिग्दर्शित पुष्पा २ मध्ये पुष्पराजच्या भूमिकेत पाहायला मिळतो आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुन व्यतिरिक्त, रश्मिका मंदाना, फहाद फासिल, सुनील, राव रमेश आणि जगपती बाबू हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. या सर्व लोकांच्या अभिनयाचे चित्रपटात खूप कौतुक होत आहे. पुष्पा २ चे बजेट जवळपास ५५० कोटी रुपये आहे. अवघ्या ३-४ दिवसांत बजेट वसूल करण्यात हा चित्रपट यशस्वी ठरला आहे.पुष्पा २ने १२ दिवसांत १४०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. पुष्पा २चे बजेट जवळपास ५०० कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. इतकेच नाही तर चित्रपटाने बजेटच्या जवळपास तिप्पट वसुली केली आहे आणि त्यातील एक मोठा भाग हिंदी आवृत्तीतून आला आहे.

Recent Posts

‘प्रधानमंत्री जनधन योजना’चे अभूतपूर्व जागतिक यश!

प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…

26 minutes ago

ट्रम्प टॅरिफ अनर्थ…

उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…

27 minutes ago

दीर्घकालीन गुंतवणूक आणि गुंतवणुकीचे फायदे

डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…

34 minutes ago

ऑटोजगताची भरारी, सोनेखरेदीची क्लृप्ती

महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…

38 minutes ago

‘आता हीच तर कुठे सुरुवात आहे…’

- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…

46 minutes ago

नितीन गडकरींच्या एकलव्य एकल शाळांची ज्ञानगंगा गावोगावी…!

- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…

49 minutes ago