नवी दिल्ली: दीर्घकाळाच्या प्रतीक्षेनंतर केंद्र सरकार आज मंगळवारी एक देश, एक निवडणूक विधेयक(One Nation One Election) हिवाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेत सादर करणार आहे. कायदेमंत्री अर्जुन मेघवाल दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास हे विधेयक सादर करतील. भारतीय जनता पक्षाने आपल्या खासदारांसाठी व्हिपही जारी केला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार सरकारच्या या विधेयकामध्ये एनडीएच्या घटक पक्षांचीही साथ मिळाली आहे. तर विरोधी पक्षाने या विधेयकाला विरोध करण्याची योजना बनवली आहे. या वूरून विरोधी पक्ष लोकसभेत गदारोळ घालू शकतात. भारतात एक देश, एक निवडणुकीबाबत गेल्या गुरूवारी मोदी सरकारने मोठे पाऊल उचलताना केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत कायद्याशी संबंधित विधेयकाला मंजुरी दिली होती. याआधी सप्टेंबर महिन्यात कॅबिनेटने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उच्चस्तरीय कमिटीच्या प्रस्तावांनाही मंजुरी दिली होती.
प्रस्तावित कायद्यानुसार दोन टप्प्यात हा निवडणूक होण्याची तयारी केली जात आहे. पहिल्या टप्प्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होतील आणि याच्या १०० दिवसांच्या आत दुसऱ्या टप्प्यात नगर पालिका आणि पंचायतींच्या निवडणुका करण्याची तयारी आहे.
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…
गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…
भालचंद्र ठोंबरे शुरसेन देशात चित्रकेतू नावाचा एक चक्रवर्ती राजा होता. तो अतिशय धार्मिक, सुंदर, सर्वगुणसंपन्न…
अॅड. रिया करंजकर कायदेशीर कामकाज करताना प्रत्येक वेळी स्टॅम्प पेपरची गरज भासते. हे स्टॅम्प पेपर…
राजश्री वटे मानवी जीवनात महत्त्वाची भूमिका असते पुस्तकाची... म्हणतात ना “वाचाल तर वाचाल’’... लहानपणापासून ते…