राज्य मंत्रिमंडळाचे खाते वाटप दोन दिवसात - मुख्यमंत्री

नागपूर: राज्यातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप आगामी 2 दिवसात पूर्ण करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून प्रारंभ होतोय. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत फडणवीस बोलत होते.

नागपूरच्या राजभवनात रविवारी 33 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्री अशा एकूण 39 मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. त्यानंतर खाते वाटपाबाबत उत्सुकता ताणली गेली होती. त्यानुषंगाने फडणवीस म्हणाले की, मंत्रिमंडळामध्ये सर्व समाजाला स्‍थान दिले आहे. काही नाराज असून त्‍यांची समजूत काढू. तसेच येत्या 2 दिवसात खातेवाटपही पूर्ण केले जाईल असे फडणवीस यांनी सांगितले. हिवाळी अधिवेशनात अभिभाषणावरील चर्चा आणि 20 बीले मांडणार आहोत. मी व माझे सहकारी चांगल काम करुन दाखवू अशी ग्‍वाहीही त्‍यांनी दिली. ईव्हीएम संदर्भात मुख्यमंत्री म्‍हणाले की, ईव्हीएम म्‍हणजे "एव्हरी व्होट फॉर महाराष्ट्र" आहे. विरोधक ईव्हीएम संदर्भात ते एक नेरेटिव पसरवत आहेत. आता त्‍यांच्याकडे कोणताही मुद्या राहिलेला नाही. सोयाबीनच्या खरेदीत मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू आहे, सोयाबिनचा हमी भावापेक्षा कमी रेट होता तो आम्ही वाढवून यावेळी दिला आहे. तसेच धानाच्या शेतकऱ्याला आम्ही मदत केल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

बीडमध्ये झालेल्‍या सरपंच हत्‍याप्रकरणी बोलताना ते म्‍हणाले की बीड जिल्ह्यातील जी घटना निर्घृण आहे. या संबंधी कारवाई झाली आहे, तीन आरोपी सापडले आहे इतरही लवकरच सापडतील आम्‍ही कोणत्याच आरोपीला सोडणार नाही. एसआयटी नेमून त्‍याच्या माध्यमातून सर्व धागे दोरे आम्ही काढू. पूढे त्‍यांनी विरोधकांना टोला लगावला. चर्चा न करता पळ काढू नये, सभागृहात बोला केवळ मीडियातून बोलू नका असे विराधकांना सांगितले. आम्‍ही सर्व मुद्यावर चर्चा करू असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

Comments
Add Comment

कार्तिकी एकादशीसाठी मध्य रेल्वेकडून विशेष रेल्वे, जाणून घ्या वेळापत्रक

सोलापूर: वारकऱ्यांसाठी कार्तिकी एकादशी महत्त्वाची असते. याच पंढरपूरच्या कार्तिकी

यंदा कर्तव्य असणाऱ्यांसाठी गुड न्यूज, नोव्हेंबरपासून जूनपर्यंत तब्बल ६८ विवाह मुहूर्त

ठाणे (वार्ताहर) : तुळशी विवाहानंतर लग्नसराईचा धडाका सुरू होतो. यंदा नोव्हेंबरपासून जूनअखेरपर्यंत तब्बल ६८ विवाह

"शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचेपर्यंत आमचा प्रयत्न सुरूच राहील" : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दुष्काळमुक्तच नाही तर, हरित माणदेशाच्या दिशेने मार्गक्रमण! सातारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज फलटण,

पंढरपूरमध्ये कार्तिकी यात्रेला प्रारंभ, २४ तास दर्शनाची सुविधा!

पंढरपूर : पंढरपूरमध्ये विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भक्तीच्या

नातेवाईकांना भेटण्यासाठी गेलेले मराठवाड्याचे प्राध्यापक येताना पत्नीसह भीषण अपघात दगावले...

पुणे : छत्रपती संभाजीनगरातील पडेगाव परिसरात शनिवारी सायंकाळी घडलेल्या भीषण अपघातात विद्यापीठाचे निवृत्त

पिंपरीत भाजप स्वबळावर लढणार

भाजप-अजित पवार गट आमने-सामने पिंपरी : महायुती सरकारमध्ये सहभागी असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे