नोकरीवरून कमी केल्याच्या रागातून तरूणाचा अधिकाऱ्यावर हल्ला

  68

सोलापूर : नोकरीवरून कमी केल्याचा राग मनात धरून एका तरुणाने माळशिरस तालुका पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यावर हल्ला केल्याची घटना घडली. याप्रकरणी संबंधित तरुणाविरुद्ध माळशिरस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.


माळशिरस तालुका पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आबासाहेब हरी पवार (वय ५२, मूळ रा. ढोलेवाडी, ता. शिराळा, जि. सांगली) यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार अमोल बाबासाहेब पाटील असे आरोपीचे नाव आहे. माळशिरस तालुका पंचायत समिती कार्यालयात अमोल पाटील हा नोकरीवर होता. परंतु कर्तव्य कचराईमुळे आणि असमाधानकारक कामामुळे त्याची चौकशी होऊन जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार त्यास नोकरीवरून कमी करण्यात आले होते.


त्यामुळे तो अस्वस्थ होता. त्यातूनच रागापोटी त्याने गट विकास अधिकारी आबासाहेब पवार यांच्या शासकीय बंगल्यात घुसून त्यांच्यावर काठीने हल्ला केला. त्यांच्या खिशातील पाच हजारांची रोकडही त्याने बळजबरीने काढून घेतली. तुमच्यामुळे माझी नोकरी गेली, तुम्ही पुन्हा मला कामावर घेतले नाही तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही, माळशिरसमध्ये तुम्ही नोकरी कशी करतात तेच बघतो, अशी धमकीही त्याने दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Comments
Add Comment

सिंहगडावरुन बेपत्ता झालेला गौतम चार दिवसांनी दरीत जिवंत आढळला

पुणे : पुण्यातील सिंहगड किल्ल्यावरील तानाजी कडा येथून बेपत्ता झालेला २४ वर्षांचा गौतम गायकवाड जिवंत आहे. गौतम

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय, पुण्यात 27 ते 6 तारखेपर्यंत दारू बंदी

पुण्यामध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दारूबंदीचा निर्णय घेतला आहे. पुण्यात २७ ते ६

मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड, पालिकेआधी भाजपचा मोठा निर्णय, कोण आहेत अमित साटम?

मुंबई पालिका निवडणुकीच्याआधी भाजपने एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड झाली आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात

मुंबई : एकनाथ शिंदेंच्या खात्यावर मुख्यमंत्र्यांची नाराजी, बैठकीला शिंदे उपस्थित नसल्याची माहिती

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाराजीच्या बातम्या समोर येत असताना

सिंधुदुर्ग : कार ऑन रेल सेवेने पाचपैकी चार वाहने नांदगावला उतरली

सिंधुदुर्ग : कोकण रेल्वेची पहिली कार ऑन ट्रेन कोलाड (जि. रायगड) स्थानकावरून निघाली आणि रात्री नांदगाव (जि.