मुंबई : दादर स्टेशन येथील ८० वर्षांचे हनुमान मंदिर पाडण्याची नोटीस केंद्र सरकारच्या अखत्यारीतील रेल्वे विभागाने दिली आहे. दादर रेल्वे स्थानकातील हमालांनी या मंदिराची स्थापना केली आहे. दादर स्थानकातील हमाल आणि हिंदू कॉलनी परिसरातील लाखो भाविकांचे हे मंदिर श्रद्धास्थान आहे. या मंदिराला काढून घेण्याची नोटीस मंदिर विश्वस्त समितीला बजावण्यात आली आहे.
मध्य रेल्वेच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १२ जवळ आरपीएफ ऑफिसजवळ हे हनुमान मंदिर आहे. आठ दशकांपूर्वी स्थानकातील हमालांनी या मंदिराची स्थापना केली. याच ठिकाणी साई बाबांचेही छोटे मंदिर आहे. आठ दशकांपासून असलेले हे मंदिर बेकायदा असल्याचे सांगत ते पाडण्यासाठी मध्य रेल्वेच्या कार्यकारी सहायक मंडल इंजिनियर यांनी नोटीस बजावली आहे. सात दिवसात हे बेकायदा बांधकाम पाडावे अन्यथा रेल्वे विभागाकडून बांधकाम हटवण्यात येईल.