Mandhardevi Kalubai Yatra : तारीख ठरली! यंदाची मांढरदेवी काळुबाईची यात्रा १२ जानेवारीला भरणार

सातारा : राज्यभरातील भाविकांना नवसाला पावणारी देवी अशी मोठी ख्याती असलेल्या श्री काळुबाई देवीची यात्रा (Mandhardevi Kalubai Yatra) दरवर्षी पौष महिन्यात पौष पौर्णिमेला भरते. लाखो भाविक या यात्रेची आतुरतेने वाट पाहत असतात. महाराष्ट्रासह इतर राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मांढरदेवी येथील श्री काळुबाई देवीच्या यात्रेची तारीख समोर आली आहे.



यावर्षी काळुबाईची यात्रा येत्या १२ जानेवारी रोजी देवीचा जागर चालू होऊन मुख्य दिवस १३ जानेवारीला असणार आहे. ही यात्रा १२ ते १४ जानेवारी या कालावधीत भरणार आहे. अशातच यात्रा अवघ्या महिनाभरावर येवून ठेपली असून यात्रा उत्सवाची जोरदार तयारी सुरू झालेली आहे, अशी माहिती मांढरदेव देवस्थान विश्वस्त मंडळाकडून देण्यात आली आहे.



यात्रेदरम्यान वाहतुकीचा खोळंबा होण्याची शक्यता 


देवीच्या यात्रेसाठी कापूरहोळ- भोर- आंबाडे मार्गावरून मोठ्या प्रमाणावर आंबाडखिंड घाटमार्गे भाविकांची गर्दी होत असते. मात्र यंदा रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने वाहतुकीचा खोळंबा होण्याची शक्यता वाहन चालकांकडून वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर यावर्षीच्या यात्रेला मागील वर्षाच्या तुलनेत भाविकांची गर्दी कमी होण्याचे चित्र आहे. संबंधित विभागाने मांढरदेवी यात्रा काळासाठी सुरू असलेल्या रस्त्याचे काम पूर्ण करून दिले तरच भाविक भक्तांना आंबाडखिंड घाटमार्गे काळूबाई देवीला जाणे सोयस्कर ठरणार आहे. अन्यथा भाविकांना शेकडो किलोमीटर लांब पल्यावरून वाईमार्गे देवीच्या यात्रेला आर्थिक नुकसान सहन करून जावे लागणार आहे.

सध्या भोर -आंबाडे-आंबाडखिंड घाट रस्त्याचे नूतनीकरणाचे काम सुरू ३१ डिसेंबर पर्यंत हे काम सुरू राहणार आहे.एक महिन्यावर येऊ घातलेल्या मांढरदेवी येथील श्री काळुबाई देवीच्या यात्रेसाठी ३१ डिसेंबर पासून वाहतुकीस रस्ता पूर्णपणे खुला करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग भोर उपविभागीय अभियंता राजेसाहेब आगळे यांनी सांगितले आहे.

Comments
Add Comment

Uday Samant : "ठाकरेंचा वचननामा म्हणजे केवळ आश्वासनांची खैरात!" मंत्री उदय सामंतांचा टोला

मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून मुंबईकरांना आकर्षित करण्यासाठी

१५ ते २५ जानेवारीदरम्यान पुणे रेल्वे प्रवासात बदल, कोणत्या गाड्या रद्द? जाणून घ्या

पुणे : रेल्वेने प्रवास करणाऱ्या पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुणे रेल्वे विभागाकडून दौंड–मनमाड

पौष पौर्णिमेनिमित्त खंडोबा मंदिराला शिखरी काठ्यांची देवभेट

जेजुरी : पौष पौर्णिमा हा खंडोबाचा लग्नसोहळा दिवस असतो. यानिमित्त जेजुरीच्या खंडोबा मंदिरावर आज रविवारी दुपारी

हिंदी भाषेची सक्ती केली जाणार नाही; महाराष्ट्रात मराठीचा सन्मान वाढवला जाईल

मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन नाही, ती आपली ओळख आणि अस्तित्व “मराठी ही केवळ भाषा नाही, ती आपली ओळख आहे, आपली

लातूरचे नवोदय विद्यालय हादरलं; वसतिगृहात विद्यार्थिनी आढळली मृतावस्थेत

लातूर : लातूर येथील जवाहर नवोदय विद्यालयात शिकणाऱ्या सहावीतील विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना

Buldhana : बुलढाण्याचा अडीच वर्षांचा चिमुकला ठरला 'गुगल बॉय', फक्त २ मिनिटांत ७१ देशांच्या राजधान्या तोंडपाठ

'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये कोरले नाव बुलढाणा : ज्या वयात मुले अडखळत शब्द बोलू लागतात, त्याच वयात बुलढाणा