Monday, May 12, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजक्राईम

Pune Crime : आठवीतील मुलीला चौथा महिना! आमिष दाखवून आरोपीचे १२ वर्षीय मुलीसोबत शारीरिक संबध

Pune Crime : आठवीतील मुलीला चौथा महिना! आमिष दाखवून आरोपीचे १२ वर्षीय मुलीसोबत शारीरिक संबध

अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल


पुणे : विद्येचं माहेरघर मानले जाणाऱ्या पुणे शहरातून (Pune News) धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातल्या लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एक शाळकरी मुलगी गर्भवती राहिल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकारामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून पुणे पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरु आहे. (Pune Crime)



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये अल्पवयीन आरोपी मुलाने ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान पीडित मुलीला आमीष दाखवत १२ वर्षीय शाळकरी मुलीला आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर शाळकरी मुलगी ४ महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर पीडित मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितला. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने लोणीकंद पोलिस ठाण्यामध्ये धाव घेत मुलाविरोधात तक्रार दाखल केली.


दरम्यान, आरोपी मुलगा १७ वर्षाचा असून त्याच्याविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. याप्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. (Pune Crime)

Comments
Add Comment