दोन वर्षांत १६० बेस्ट बसेसचा अपघात; ५० मृत्यू, १५० जखमी

मुंबई : सर्वसामान्यांची दुसरी लाईफ लाईन म्हणून ओळख असलेल्या बेस्ट बसेस प्रवाशांसाठी असुरक्षित ठरत आहेत. बसेसमध्ये कंत्राटी पद्धतीवर बसेस आल्यानंतर अपघातांचे प्रमाण वाढते आहे. जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२४ या दोन वर्षाच्या कालावधीत बेस्टच्या मालकीच्या व भाडेतत्त्वावरील बसेसचे १६० अपघात झाले. या अपघातात ५० जणांचा मृत्यू झाला असून १५० जण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी कुर्ला येथील अपघातात सात जणांचा जीव गेला असून ४२ जण जखमी झाले आहेत. वाढत्या बेस्ट अपघातामुळे बेस्ट सुरक्षित आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.


बेस्ट बसची जगभरात ओळख आहे. सुरक्षित प्रवासासाठी बेस्ट बसला प्रवासी पसंती देतात. मात्र गेल्या दोन वर्षात अपघातांच्या घटना वाढत आहेत. सोमवारी कुर्ल्याच्या हादरवणा-या घटनेनंतर संताप व्यक्त केला जातो आहे. मागील दोन वर्षात विविध ठिकाणी झालेल्या घटनांत बेस्ट बसेसच्या १६० अपघातात ५० जणांचा मृत्यू झाला आहे. तर १५० जण जखमी झाल्याचे बेस्ट उपक्रमाने दिलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे.


दादर टीटी खोदादाद सर्कल येथे बेस्ट उपक्रमाच्या तेजस्वीनी बसने सिग्नलवर उभ्या असलेल्या डंपरला मागून धडक दिल्याची घटना २ नोव्हेंबर २०२१ रोजी घडली होती. या दुर्घटनेत गंभीर जखमी चालकाच्या मृत्यूसह ३ जणांचा मृत्यू तर ८ जखमी झाले होते. तर भांडुप येथे ११ ऑगस्ट २०२१ रोजी बेस्ट बस इलेक्ट्रिक कॅबिनवर धडकली होती. या दुर्घटनेत वृद्धाचा मृत्यू तर दोन जखमी झाले होते. २२ जून २०२३ रोजी गिरगाव येथे बेस्ट बसला झालेल्या अपघातात वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.


बेस्ट उपक्रमाच्या प्रचलित पध्दतीनुसार मोटार अपघात दावा न्यायाधिकरण येथे दाखल करण्यात येतो. जानेवारी २०२२ ते जानेवारी २०२४ या कालावधीमध्ये न्यायाधिकरणाने दिलेल्या निवाड्यानुसार व राष्ट्रीय लोक अदालत मध्ये सुमेटाने निकाली काढण्यात आलेल्या एकूण १२ प्रकरणांत जखमींना ९ कोटी ७८ लाग २२ हजार ९७६ रुपये व एकूण ५३ प्रकरणांमध्ये मृतांच्या कायदेशीर वारसांना ११ कोटी २२ लाख ६८ हजार ५६६ रुपये इतकी नुकसान भरपाई देण्यात आल्याचे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले. कुर्ला येथील बेस्ट अपघातात सात जणांचा जीव गेला आहे. तर ४२ जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बेस्टने मृतांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे. तर मुंबई महापालिका बेस्ट प्रशासनाकडून जखमींवरील उपचार मोफत केले जाणार आहेत.

Comments
Add Comment

नवी मुंबई विमानतळाची तिसऱ्या धावपट्टीकडे वाटचाल

सिडकोकडून सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दीर्घकालीन

प्रचार सभेसाठी शिवाजी पार्कवर कुणाचा आवाज घुमणार? एकाच तारखेसाठी सत्ताधारी आणि विरोधक आग्रही

मुंबई: महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजले आणि मुंबई पालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी सर्वच पक्षांची रणनीती सुरू

मुंबईच्या महापौर आरक्षणाची पाटी नव्याने?

चक्राकार पध्दतीने नव्हे तर नव्याने आरक्षण सोडली जाण्याची शक्यता मुंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्या आगामी

दहिसरमधून उबाठाला व्हाईट वॉश करण्याची महायुतीला संधी

मुंबई (सचिन धानजी): दहिसर विधानसभा क्षेत्रामध्ये प्रभाग क्रमांक १मध्ये म्हात्रे आणि घोसाळकर यांच्याशिवाय कुणीच

आचारसंहिता लागू, विद्रुप झालेल्या मुंबईने घेतला मोकळा श्वास; तब्बल २ हजार १०३ जाहिरात फलक हटवले

मुंबई (विशेष प्रतिनिधी): राज्य निवडणूक आयोगाने १५ डिसेंबर २०२५ रोजी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची

सुभाष सिंग ठाकूरला २२ डिसेंबरपर्यंत कोठडी

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक गँगस्टार सुभाष सिंग ठाकूरला मीरा-भाईंदर, वसई-विरार मध्यवर्ती