Aadhaarcard Update : १५ डिसेंबरपूर्वी आधार अपडेट करा आणि आयटीआर भरा, अन्यथा भरावा लागेल दंड!

मुंबई : ह्या वर्षातील शेवटचा महिना संपण्यासाठी अवघे २० दिवस शिल्लक राहिले आहेत. अनेक महत्वाची कामे ही नागरिकांना येत्या काही दिवसांत पूर्ण करायची आहेत. जी डेडलाइनसंपण्याच्या आधी पूर्ण करावी लागणार आहे. यामध्ये आयटीआर भरण्यापासून ते आधार कार्डमधील अपडेट आदी बाबींचा समावेश आहे. ही कामे १५ डिसेंबर पूर्वी पूर्ण करावी लागणार आहेत.


ज्यांचे आधार कार्ड १० वर्षे जुने आहे, ते १५ डिसेंबरपर्यंत ते मोफत अपडेट करू शकतात. नाव अपडेट करणे, पत्ता, जन्मतारीख आणि फोटो देखील दुरुस्त करता येणार आहे. ठरलेल्या तारखेनंतर जर तुम्ही आधार कार्ड अपडेट केल्यास तुम्हाला आधार कार्ड सेंटरवर जाऊन त्या ठिकाणी ५० रुपये शुल्क भरून दुरुस्ती करावी लागणार आहे. त्याचबरोबर बायोमेट्रिक माहितीतील बदलांसाठी १०० रुपये देखील मोजावे लागणार आहेत.



असे करा आधार कार्ड अपडेट


- प्रथम संकेतस्थळावर (https://myaadhaar.uidai.gov.in/) जा. या ठिकाणी आधार क्रमांकाने लॉगिन करा.


- त्यानंतर प्रोसीड टू अपडेट अॅड्रेस ऑप्शन सिलेक्ट करा. आधारसोबत रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबरवर तुम्हाला ओटीपी पाठवला जाईल.


- त्यानंतर 'डॉक्युमेंट अपडेट' हा पर्याय निवडा. यानंतर तुम्हाला सर्व डिटेल्स दिसतील. याची पडताळणी करा.


- आता तुम्हाला जी माहिती अपडेट करायची आहे ती सिलेक्ट करा. यानंतर विनंती केलेल्या कागदपत्राची स्कॅन केलेली प्रत अपलोड करा.


- जन्मतारीख एकदाच अपडेट करता येईल, हे लक्षात ठेवा.


ईपीएफओशी संलग्न खासगी क्षेत्रातील नवीन कर्मचाऱ्यांसाठी युनिव्हर्सल अकाउंट नंबर (यूएएन) सक्रिय करण्याची मुदतही संपत आली आहे. कर्मचाऱ्यांना आता १५ डिसेंबरपर्यंत आपले यूएएन आणि बँक खाते आधारशी लिंक करावे लागणार आहे. यापूर्वी त्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर होती, परंतु ईपीएफओने ती तारीख १५ डिसेंबरपर्यंत वाढवली.


यूएएन सक्रिय झाल्याने कर्मचारी एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव (ईएलआय) योजनेचा लाभ घेऊ शकतील. सध्या चालू आर्थिक वर्षात कामावर आलेल्या कर्मचाऱ्यांकडूनच माहिती अपडेट केली जात आहे. पुढील टप्प्यात जुन्या कर्मचाऱ्यांनाही आपला तपशील अपडेट करावा लागणार आहे.



उशिरा आयटीआर भरण्याची शेवटची संधी


जर एखाद्या करदात्याने २०२३-२४ या आर्थिक वर्षाचे प्राप्तिकर विवरणपत्र भरले नसेल तर ते भरण्यासाठी त्यांच्याकडे ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत आहे. करदाते विलंबाने आयटीआर भरू शकतात. आयटीआर उशिरा भरताना तुम्हाला दंड भरावा लागणार आहे, जो १००० रुपयांपासून ५००० रुपयांपर्यंत असू शकतो.


याशिवाय अॅडव्हान्स टॅक्स भरण्याची शेवटची तारीख १५ डिसेंबर आहे. १५ मार्चपर्यंत १०० टक्के अॅडव्हान्स टॅक्स भरावा लागणार आहे. १५ सप्टेंबरपर्यंत ४५ टक्के, १५ डिसेंबरपर्यंत ७५ टक्के आणि १५ मार्चपर्यंत १०० टक्के रक्कम जमा करायची आहे. डेडलाइन ओलांडल्यास दंड आणि व्याज भरावे लागू शकते.

Comments
Add Comment

‘आंदोलन कायम ठेऊन मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार’- बच्चू कडू

मुंबईला जाऊन मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा करणार नागपूर : कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांच्या

महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातल्या आरोपीने लपवलेल्या मोबाईलमध्ये मिळाला मृत्यूपूर्वीचा 'तो' फोटो...

फलटण: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात नवा धक्कादायक खुलासा झाला आहे. आत्महत्या

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हिव्हिपॅट नाहीच; काय दिलं निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅटच्या वापराबाबत कायद्यांत तरतूद नाही मुंबई : स्थानिक

Maharashtra Local Body Election : १० नोव्हेंबरआधी आचारसंहिता लागू होणार? मोठी अपडेट आली समोर

मुंबई : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठी माहिती

महाराष्ट्रात सागरी क्षेत्रात गुंतवणुकीसाठी वातावरण पोषक

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांचे प्रतिपादन मुंबई  : राज्याने जहाज बांधणी, दुरुस्ती, पुनर्वापर आणि

Navneet Rana : भाजप नेत्या नवनीत राणांना अश्लील शिवीगाळ, पत्राद्वारे 'गँगरेप' आणि 'जीवे मारण्याची' धमकी; राजापेठ पोलिसांकडून तपास सुरू

अमरावती : भाजप नेत्या आणि अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा ( Navneet Rana) यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर