Maharashtra Board Exam : १० वी, १२ वीच्या परीक्षेसह सर्व महत्त्वाची माहिती आता मोबाईलवर! महाराष्ट्र बोर्डानं तयार केलं ॲप

पुणे : SSC आणि HSC ह्या दोन्ही बोर्डाच्या परीक्षा महत्त्वाच्या मानल्या जातात.या परीक्षेच्या रिझल्टची विद्यार्थ्यांप्रमाणे पालकांनाही प्रतीक्षा असते. या परीक्षेसंबंधी अनेकदा विद्यार्थ्यांसह पालकांना चुकीची माहिती मिळाल्यामुळे त्यांना मनस्तापाला सामोरे जावे लागते. त्यांचा हा मनस्ताप कमी व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक महामंडळाने विद्यार्थी, पालक, शिक्षकांना रीतसर माहिती उपलब्ध व्हावी, या हेतूने मोबाइल 'MSBSHSE' अ‍ॅप तयार केले आहे. या ॲपमध्ये विद्यार्थ्यांना वेळापत्रक, गुणपत्रिका, फी यासह अनेक महत्त्वाच्या परीक्षेशी संबंधित माहिती सहज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी-पालक, शाळा, कर्मचारी यांच्यासाठी हे अ‍ॅप उपयुक्त ठरणार आहे.


दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी दरवर्षी लाखो विद्यार्थी बसत असतात. त्यांना शाळांमधून माहिती दिली जाते. मात्र, सोशल मीडिया व काही खाजगी कोचींग क्लासेसच्या माध्यमांतून माहितीची शहानिशा न करता ती फॉरवर्ड केली जात होती. त्यामुळे अनेकदा गैरसमज व अफवा पसरत होत्या. त्यामुळे परीक्षा मंडळाने एमएसबीएसएचएसई अ‍ॅप सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. त्यानुसार हे अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. एमएसबीएसएचएसई ने तयार केलेले हे अ‍ॅप दहावी आणि बारावी अशा दोन्ही वर्गातील विद्यार्थ्यांना वापरता येईल, तसेच परीक्षा आणि इतर माहितींचे नोटिफिकेशनही विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक महामंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी म्हणाले, हे अ‍ॅप गूगल पले स्टोअरवर मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे ॲप, विद्यार्थी, शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांसाठी एक सोयीस्कर ठरणार आहे. यात दहावी आणि बारावी या दोन्ही विद्यार्थ्यांसाठी परीक्षांचे वेळापत्रक समाविष्ट आहे. हे ॲप राज्य मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवरील लिंकद्वारे डाउनलोड करता येणार आहे.
गोसावी म्हणाले, "एकदा ॲपचा व्यापक वापर होताच, आम्ही अतिरिक्त फीचर या अ‍ॅपमध्ये देण्याच्या विचारात आहोत. हे ॲप केवळ विद्यार्थी व पालक यांच्या सोईसाठी तयार करण्यात आले आहे. शाळा व विद्यालयातील इतर संदेश सुविधा या पूर्ववत सुरू राहणार आहेत.



गुगल प्ले स्टोअरवर मोफत उपलब्ध. विद्यार्थी, शाळा व कर्मचाऱ्यांना या अॅपवर लॉगईंन करता येणार आहे. नमुना प्रश्नपत्रिका, वेळापत्रक, निकाल यासह सर्व बाबींचा समावेश करण्यात आला आहे. फी परतावा, अंतर्गत व प्रात्यक्षिक परीक्षा गुणांसह अन्य सुविधा शाळांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अन्य नवीन सर्वसाधारण माहिती सर्वांसाठी लॉगीनशिवाय उपलब्ध करून देण्यात आली आहे.


परीक्षा बोर्ड 'एमएसबीएसएचएसई' हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवर मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे. विद्यार्थी किंवा पालक हे अ‍ॅप डाउनलोड करून वापरू शकतात. यात लॉगीन करण्यासाठी मोबाइल नंबरद्वारे नोंदणी करावी लागणार आहे.

Comments
Add Comment

पाल-खंडोबा यात्रेसाठी एसटीची जय्यत तयारी

मुंबई: नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात भाविकांच्या श्रद्धेचा महासागर उसळणार असून, त्या महासागराला सुरक्षित,

अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची तीन एकर जमीन

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री. अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास

नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी या गड किल्ल्यांवर जाण्यास बंदी; वन विभागाचा आदेश जारी

पुणे : अनेकजण नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी ३१ डिसेंबरच्या रात्री गडकिल्ल्यावर जाणे पसंत करतात. या पार्श्वभूमीवर

मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून सरकारचे खास पाऊल

मुंबई: आपल्या देशाने लोकशाही पध्दती स्विकारली असून १८ वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांनी प्रत्येक

'एसटी सोबत, स्वस्त सफर'! सुट्ट्यांसाठी एसटी महामंडळाची खास ऑफर, जाणून घ्या सविस्तर

मुंबई: ख्रिसमस आणि नववर्षाच्या सुट्टांसाठी तुमच्याकडे परवडणारा प्लॅन नाही म्हणून तुम्ही घरी बसून आहात का? तर ही

मुंबई–लातूर द्रुतगती महामार्गाला गती

सहा जिल्हे जोडले जाणार मुंबई : मुंबई ते लातूर हा प्रवास अतिजलद आणि सुलभ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास