डहाणू : आंबा मोहोराला (Mango blossom) पोषक असणारी थंडी काही दिवसांपासून गायब झाल्याने यंदा आंबे उशीरा चाखायला (Mango Season) मिळणार आहेत. फेंगल वादळाचे (Fengal Cyclone) पडसाद कोकण किनारपट्टीवर दिसून आले. आठवडाभरापासून पालघर जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्याने थंडी गायब झाली. त्यामुळे आंब्याला मोहोर येण्याच्या प्रक्रियेत व्यत्यय आला आहे. ऑक्टोबर अखेरीस थंडी पडण्यास सुरुवात होते; परंतु यंदा परतीच्या पावसाचा मुक्काम लांबल्याने थंडी पडण्यास उशीर झाला. त्यानंतर फेइंजल वादळाने वातावरणात कमालीचा बदल झाला असून, मोहोर येण्यास विलंब होणार असल्याने आंब्याचा हंगाम दीड ते दोन महिने लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा आंबे उशीरा चाखायला मिळणार आहेत.
मे महिन्यातील हंगाम जूनपर्यंत गेल्यामुळे पावसामुळे आंब्याला योग्य दर मिळणे कठीण जाईल, त्याचबरोबर जास्त दिवस बागांची रखवाली आणि औषध फवारणी करावी लागणार असल्याने बागायतदारांच्या अर्थकारणावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. बदलत्या वातावरणाने जिल्ह्यातील आंबा बागायतदारांना सुरुवातीपासून चिंतेत टाकले आहे. हे सातत्य अद्याप कायम आहे. नोव्हेंबरअखेरीस हवामानात गारठा जाणवायला सुरुवात झाली. त्यामुळे आंब्याला मोहोर येण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले होते; मात्र फेइंजल वादळामुळे अचानक थंडी गायब झाल्याने तापमानात वाढ झाली आहे.
ढगाळ वातावरण, वाढलेल्या उष्म्यामुळे फळझाडांवरील मोहोर गळून पडण्याची शक्यता आहे. तसेच नवी पालवी फुटेल. मोहोर न येता पालवी कडक होण्याची शक्यता आहे. मोहोर संरक्षण केलेल्या फळबागांचे फारसे नुकसान होणार नाही. पण मोहोर टिकविण्यासाठी औषधे व किटकनाशके फवारणी केल्यास फळबागांना संरक्षण कवच मिळेल; मात्र या सर्व उपाययोजना करणे सर्वांनाच शक्य होणार नाही.
एप्रिल-मेपर्यंत येणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील आंब्याचा हंगाम जून महिन्यापर्यंत लांबणीवर जाऊ शकतो. याच दरम्यान मोठ्या प्रमाणात पीक येणार असला तरी त्याला योग्य किंमत मिळेल, याचीही शाश्वती नाही. (Mango Season)
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…