Baaghi 4 : ‘बागी 4’ मधील संजय दत्तचा खतरनाक लूक समोर

मुंबई : साजिद नाडियादवालाच्या फ्रँचायझी असलेल्या आणि टायगर श्रॉफ स्टार 'बागी' सिनेमाचा चौथा भाग अर्थात 'बागी 4' ची घोषणा करण्यात आली होती. बागी चित्रपटाच्या शेवटच्या तीन भागांनी बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली होती आणि आता चौथ्या भागाचीही लोकांमध्ये क्रेझ वाढत आहे.आता या चित्रपटामधील खलनायकाचा नवा पोस्टर समोर आला आहे.या नव्या पोस्टरमधून संजय दत्तची व्यक्तिरेखा आणि लूक समोर आला आहे, जो पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत.





सोमवारी टायगर श्रॉफ आणि साजिद नाडियादवाला यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर बागी 4 च्या खलनायकाचे अनावरण केले. त्याने संजय दत्तचे एक जबरदस्त पोस्टर शेअर केले आहे, ज्यामध्ये या अभिनेत्याचा लूक पाहून कोणीही दंग होईल. या नव्या पोस्टरच्या माध्यमातून चित्रपटातील व्हिलनचा चेहरा रिव्हिल करण्यात आला आहे. मनोज वाजपेयी आणि जयदीप अहलावत यांच्यानंतर चित्रपटामध्ये खलनायकाच्या भूमिकेत अभिनेता संजय दत्त पाहायला मिळणार आहे. या पोस्टरमध्ये संजय दत्त कधीही न पाहिलेल्या खतरनाक लुकमध्ये दिसत आहे.या पोस्टरमध्ये संजय दत्त खूर्चीवर बसून ओरडताना दिसत आहे. तसेच त्याच्या मांडीवर रक्तबंबाळ अवस्थेत असलेली एक मुलगी पाहायला मिळते आहे. ‘हर आशिक एक विलेन है’ असं या पोस्टवर लिहलं आहे. या पोस्टरवरून अभिनेता त्याच्या प्रेमाला गमावल्यानंतर खलनायक बनतो असा अंदाज लावला जात आहे.



काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील टायगर श्रॉफचे पोस्टरही रिलीज झाले होते. ज्यामध्ये तो बाथरुममध्ये बसलेला दिसतो, त्याच्या हातात दारूची बाटली, तोंडात सिगारेट आणि हातात रक्ताने माखलेले हत्यार दिसत आहे. तर भिंतीवर रक्ताचे डाग पडलेले दिसतात. त्याच भिंतीवर 'बागी 4' ही अक्षरं दिसतात. यातच आता संजय दत्तचाही नवा अवतार समोर आला आहे. साजिद नाडियादवाला निर्मित, बागी 4 चे दिग्दर्शन ए. हर्ष करत आहेत.बागी फ्रँचायझीचा हा चौथा चित्रपट आहे. हा चित्रपट पुढील वर्षी ५ सप्टेंबर २०२५ रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. आतापर्यंत फक्त टायगर आणि संजयचे लूक समोर आले आहेत. हिरोईनबाबत अजूनही सस्पेन्स ठेवण्यात आला आहे. या चित्रपटामध्ये कोणती अभिनेत्री काम करणार हे पाहणे उत्कंठाचे ठरणार आहे.

Comments
Add Comment

मुंबईत निवडणुकीची चाहूल; राज्य सरकारचा पुनर्विकासाला चालना देणारा मोठा निर्णय

मुंबई : मुंबईतील बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याआधीच राज्य सरकारने नागरिकांना थेट लाभ

मुंबईकर गारठले; थंडीमुळे पारा १६.२ अंशावर !

मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांत हिवाळ्याची चाहूल

मुंबईत बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार ; कारमध्ये झाडल्या गोळ्या

मुंबई : मुंबईत भर दुपारी एक धक्कादायक घटना घडली आहे. कांदिवली चारकोप परिसरातील एका व्यावसायिकांवर हल्ला झाला.

अंधेरी रेल्वे स्टेशनवरील धर्मांतराचा सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल ; पोलीस तपासात आली भलतीच माहिती समोर

मुंबई : सोशल मीडियावर अंधेरी रेल्वे स्टेशनवर धर्मांतर सुरु असल्याचा दावा करणारा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात

मुलुंडमध्ये शत प्रतिशत भाजपा, शिवसेनेच्या वाट्याला जाणार नाही एकही प्रभाग

मुंबई (सचिन धानजी): उत्तर पूर्व अर्थात ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघातील मुलुंड विधानसभा मतदार हा संघ भाजपाचा

मुलुंडमध्ये शत प्रतिशत भाजप

युतीमध्ये या विधानसभा मतदार संघात शिवसेनेच्या वाट्याला जाणार नाही एकही प्रभाग सचिन धानजी मुंबई : उत्तर पूर्व