Farmers Protest : शेतकऱ्यांचा पुन्हा दिल्ली चलो एल्गार! शंभू सीमेवरून १०१ शेतकरी कूच करणार

नवी दिल्ली : दिल्लीत संसदेत हिवाळी अधिवेशन सुरु असून यापार्श्वभूमीवर आता शेतकऱ्यांनी पुन्हा आंदोलनाचे (Farmers Protest) हत्यार उपसले आहे. मागण्या मान्य होत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा 'दिल्ली चलो'चा (Delhi chalo) नारा दिला असून किसान मजदूर मोर्चा आणि एसकेएम गटातील १०१ शेतकरी आज दिल्लीकडे कूच करणार आहेत. परंतु हे आमदोलन रोखण्यासाठी पंजाब-हरियाणा सीमेवर मोठ्या प्रमाणात सुरक्षा तैनात करण्यात आल्या आहेत.


शेतकरी नेते सर्वनसिंग पंढेर यांनी दिलेल्या माहितीनुसार, किमान आधारभूत किंमतीसाठी कायदेशीर हमीसह त्यांच्या चिंता आणि मागण्यांबाबत केंद्राकडून चर्चेसाठी कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आज त्यांनी १०१ शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ दुपारी १२ च्या सुमारास दिल्लीकडे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु यादरम्यान केंद्राने शेतकरी आणि मजुरांशी चर्चा न करण्याचा निर्णय घेतला असून ते आम्हाला रोखण्यासाठी बळाचा वापर करत आहेत. त्यामुळे यावेळी ते शांततेत आणि शिस्तीने दिल्लीत जाणार असल्याचे सांगितले.



शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत?


नवीन भूसंपादन कायद्यानुसार १ जानेवारी २०१४ नंतर संपादित केलेल्या जमिनीच्या चौपट मोबदला मिळायला हवा, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. गेल्या १० वर्षांपासून गौतम बुद्ध नगरमध्ये सर्कलचे दर वाढलेले नाहीत. नवीन भूसंपादन कायद्याचा लाभ जिल्ह्यात लागू झाला पाहिजे. भूसंपादनाच्या बदल्यात १० टक्के विकसित जमीन द्यावी आणि ६४.७ टक्के दराने भरपाई द्यावी, अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे. जमीनदार आणि भूमिहीन शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार आणि पुनर्विकासाचा लाभ मिळावा. उच्चाधिकार समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी. लोकसंख्या असलेल्या क्षेत्राची योग्य विल्हेवाट लावली पाहिजे. हे सर्व निर्णय शासनस्तरावर घ्यायचे आहेत.



पोलिसांकडून अश्रुधुराचा मारा


पंजाब-हरियाणा सीमेवरील शंभूपासून दिल्लीकडे मोर्चा नेण्यासाठी १०१ शेतकऱ्यांनी काल सकाळी तयारी केली होती. मात्र काही मीटर अंतरावरच त्यांना हरियाणा सुरक्षा दलांनी टाकलेल्या बॅरिकेडमुळे थांबावे लागले. बॅरिकेडपर्यंत आंदोलक पोहोचल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर अश्रुधुराचा मारा केला आणि आंदोलकांना मागे जाण्यास भाग पाडले. (Farmers Protest)

Comments
Add Comment

जैसलमेरमध्ये भीषण अपघात, बसला आग लागल्याने २० जणांचा मृत्यू

मुंबई : जैसलमेरहून जोधपूरकडे निघालेल्या एका खासगी बसला जैसलमेर-जोधपूर महामार्गावर थईयात

योगी सरकारची उत्तर प्रदेशातील १.८६ कोटी महिलांना 'ही' दिवाळी भेट!

लखनऊ: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील १.८६ कोटी माता-भगिनींना

गुगलची भारतात $१५ अब्ज गुंतवणूक; विशाखापट्टणममध्ये देशातील पहिले गिगावॅट-स्केल एआय हब उभारणार

नवी दिल्ली : भारताच्या डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा गाठत, गुगलने भारतात आपल्या

डॉक्टरांनी लाच घेऊन मुलांच्या जीवाशी खेळ केला, पोलिसांचा कोल्ड्रिफ प्रकरणात गंभीर आरोप

छिंदवाडा : खोकल्यावरचे औषध म्हणून कोल्ड्रिफ कफ सिरप प्यायलेल्या मध्य प्रदेशमधील अनेक लहान मुलांचा मृत्यू झाला.

IND vs WI : वेस्ट इंडिजचा सुपडा साफ! टीम इंडियाचा वेस्ट इंडिजवर ७ विकेट्सने दणदणीत विजय, सलग १०वी कसोटी मालिका खिशात!

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या (India vs West Indies) दुसऱ्या कसोटी सामन्यात शानदार विजय मिळवून

ला निनामुळे नोव्हेंबरपासून तीव्र थंडीचा अंदाज

राज्यातून मान्सून माघारी परतलाय, पण ऑक्टोबर हीटमुळे सध्या अंगातून घामाच्या धारा निघत आहे. पहाटे हवेत प्रचंड