Shahaji Bapu Patil : सांगोला माजी आमदारांच्या कार्यालयाबाहेर दगडफेक; फॉर्च्युनर फोडली!

करारा जबाव मिलेगा, संतप्त शिवसैनिकांची पोस्ट


सोलापूर : राज्यभरात सुरु असणाऱ्या विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम संपला असला तरीही विरोधकांची टोलेबाजी सुरुच आहे. अशातच काय झाडी, काय डोंगार, काय हाटील फेम माजी आमदार शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांच्या पुतण्याच्या कारवर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयाबाहेर उभ्या असलेल्या फॉर्च्युनर गाडीवर एका अज्ञाताकडून दगडफेक करण्यात आली आहे. यावेळी कार्यालयात शहजी बापूंचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित असताना हा प्रकार घडला. मात्र, दगड मारणारा तरुण पळून गेल्याने आता सीसीटीव्हीच्या सहाय्याने पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे.


दरम्यान, शहाजी बापू पाटील हे कार्यालयात नसताना हा प्रकार घडला असून पदाधिकारी व कार्यकर्ते चांगलेच संपापले आहेत. तसेच, शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ, असेही कार्यकर्त्यांनी सोशल मीडियातून म्हटले आहे.



शिवसैनिकांचा करारा जबाव


'जाहीर निषेध... करारा जबाव मिलेगा'. आज सांगोल्यात सागर पाटील यांच्यावर जो भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला त्याचा जाहीर निषेध. पोलिस प्रशासनाला विनंती आहे की, लवकरात लवकर कठोर कारवाई करावी. अन्यथा शिवसेनेच्या वतीने हल्लेखोराना शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल , अशी सोशल मीडिया पोस्ट पाटील समर्थकांकडून करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

कोल्हापूरात काँग्रेसला सर्वाधिक जागा; तरीही सत्ता महायुतीचीच!

मुंबई : महापालिकेची सत्ता मिळवण्यासाठी विविध पक्ष, उमेदवार व कार्यकर्त्यांनी साम-दाम-दंड-भेदाचा पुरेपूर वापर

अजित पवारांच्या हातून पिंपरी चिंचवडही गेले

पुण्यात उबाठाचा केवळ १ नगरसेवक विजयी ‘वंचित’ने खातेच उघडले झाले पुणे : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या १२८

‘अण्णांनी’ केलं ‘दादांना’ गारद

मोहोळांच्या रणनितीपुढे अजित पवार फिके; राष्ट्रवादीची पडझड पुणे : पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक निकालांनी

मालेगाव महापालिकेत ‘इस्लाम’ची मुसंडी

मुंबई : मालेगाव महानगरपालिका निवडणुकीत इस्लाम पार्टी सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला असून निवडणूक झालेल्या ८३

वसंतदादा पाटील यांची चौथी पिढी राजकारणात

सांगली : माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील घराण्यातील चौथ्या पिढीतील वारसदार हर्षवर्धन पाटील यांनी

लातूरमध्ये कॉग्रेसचा ‘ हात’ भारी

अमित देशमुख यांनी चक्रव्यूह भेदले लातूर : दलित, मुस्लिम आणि लिंगायत मतांचा आधार घेत आखलेल्या रणनीतीला भाजपच्या