महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत आलेल्या प्रवाशांसाठी सीएसएमटीहून अनारक्षित विशेष गाड्या

मुंबई:मध्य रेल्वे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली वाहण्यासाठी मुंबईत आलेल्या प्रवाशांच्या सोयीसाठी दि. ०६.१२.२०२४, दि. ०७.१२.२०२४ आणि दि. ०८.१२.२०२४ रोजी अनारक्षित विशेष गाड्या चालवणार आहे.

दि. ६.१२.२०२४ रोजी सुटणाऱ्या गाड्या

ट्रेन क्रमांक 01249 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - नागपूर विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १६.४५ वाजता सुटेल.

ट्रेन क्रमांक 01251 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - नागपूर विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १८.३५ वाजता सुटेल.

दि. ७.१२.२०२४ रोजी सुटणाऱ्या गाड्या

ट्रेन क्रमांक 01246 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कलबुरगी विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००.२५ वाजता सुटेल.

गाडी क्रमांक 01217 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - अमरावती विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००.४० वाजता सुटेल.

ट्रेन क्रमांक 01255 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - नागपूर विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १२.३५ वाजता सुटेल.

गाडी क्रमांक 01253 दादर - नागपूर विशेष दादर येथून ००.४० वाजता सुटेल.

गाडी क्रमांक 07057 दादर-आदिलाबाद विशेष दादर येथून ०१.०५ वाजता सुटेल.

दि. 8.12.2024 रोजी सुटणाऱ्या गाड्या

ट्रेन क्रमांक 01257 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - नागपूर विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १८.३५ वाजता सुटेल.

गाडी क्रमांक 01259 दादर-नागपूर विशेष दादर येथून ००.४० वाजता सुटेल.

ट्रेन क्रमांक-01249, 01251, 01255, 01253, 01257 आणि 01259 ची संरचना आणि थांबे

१८ सामान्य द्वितीय श्रेणी.

दादर, कल्याण, कसारा, इगतपुरी, नाशिकरोड, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, जलंब, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा, सेवाग्राम आणि अजनी.

ट्रेन क्रमांक-01217 ची संरचना आणि थांबे

१६ सामान्य द्वितीय श्रेणी.

दादर, कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, नांदुरा, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर आणि बडनेरा

ट्रेन क्रमांक-01246 ची संरचना आणि थांबे

२४ सामान्य द्वितीय श्रेणी.

दादर, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड, कुर्डूवाडी, सोलापूर, अक्कलकोट रोड आणि गाणगापूर रोड.

ट्रेन क्रमांक-07057 ची संरचना आणि थांबे

१४ सामान्य द्वितीय श्रेणी.

कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, नगरसोल, रोटेगाव, लासूर, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, मानवत रोड, परभणी, पूर्णा, एच एस नांदेड, भोकर, हिमायतनगर आणि किनवट.

सामान्य शुल्कासह अनारक्षित डब्यांसाठी बुकिंग यूटीएस द्वारे करता येईल. या विशेष गाड्यांच्या तपशीलवार वेळा आणि थांब्यांसाठी, कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा.

रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी आणि मार्गदर्शनासाठी पुरेशा उपाययोजना केल्या आहेत. प्रवासी मदतीसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/दादर येथील हेल्प डेस्कशी संपर्क साधू शकतात.
Comments
Add Comment

महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणावर कांद्याची विक्री नाही - नाफेड

मुंबई : नॅशनल ॲग्रीकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लि.(नाफेड

न्हावा शेवा बंदरावर आले पाकिस्तानी कंटेनर! DRI ची सर्वात मोठी कारवाई

न्हावा शेवा बंदरातून १२ कोटी रुपयांचे पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधने आणि सुके खजूर जप्त नवी मुंबई:  न्हावा शेवा

आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन, सोमवारी घेणार राज्यपालपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पत्नी दर्शना देवी यांच्यासह रविवारी मुंबई

मुंबई विमानतळावर बनावट भारतीय पासपोर्टवर फिरताना आढळले नेपाळी आणि बांगलादेशी नागरिक

मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अलीकडेच दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली

मराठा समाजाच्या दोन आरक्षणावर न्यायालयाचा सवाल

एसईबीसीअंतर्गत १० टक्के, की ओबीसीमधून मिळणार आरक्षण मराठा आरक्षणावर ४ ऑक्टोबरला पुढील सुनावणी आरक्षणावरून

मुंबईत मद्यपी तरुणीमुळे अपघात, फुटपाथवर गेली कार आणि...

मुंबई : मद्यपी तरुणीने बेदरकारपणे कार चालवली आणि अपघात झाला. दुभाजकाचा कठडा तोडून कार फुटपाथवर (पदपथ) झोपलेल्या