Monday, February 17, 2025
Homeताज्या घडामोडीMiraroad Metro : भीषण अपघात! मेट्रोचे काम करणारा मिक्सर २० फूट खोल...

Miraroad Metro : भीषण अपघात! मेट्रोचे काम करणारा मिक्सर २० फूट खोल खड्डयात कोसळला

चालकाचा चिरडून मृत्यू, दोन जण जखमी

भाईंदर : मेट्रो मार्ग क्र.९ वरील मीरा गाव मेट्रो स्थानकाजवळ रस्ता खचल्यामुळे झालेल्या खड्यात एक मिक्सर पडून मिक्सरचा चालक मिक्सर खाली चिरडला जाऊन त्याचा मृत्यू झाला आहे तर दोन क्लिनर जखमी झाले आहेत. (Accident News)

Devendra Fadanvis : मोठी बातमी ! शपथविधीआधी फडणवीसांचा शरद पवारांना फोन

मीरा भाईंदर मुंबई शहराला जोडण्यासाठी दहिसर ते भाईंदर मेट्रो मार्ग क्र.९ला (Miraroad Metro) शासनाने मंजुरी देऊन ९ सप्टेंबर २०१९ ला मेट्रोचे काम सुरू झाले होते. हे काम तीन वर्षांच्या कालावधीत पूर्ण होणार होते. परंतू अजूनही पुर्ण झालेले नाही. बुधवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास मीरा गाव मेट्रो स्थानकाजवळ रस्ता खचल्यामुळे झालेल्या साधारण २० फूट खोल खड्डयात मिक्सर कोसळला आणि त्या खाली आलेला चालक गंभीर जखमी झाला आणि उपचार दरम्यान गुरुवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला. तर अन्य दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, महापालिकेच्या अग्निशमनदलाने क्रेनच्या सहाय्याने सिमेंटचा मिक्सर खड्डयातून बाहेर काढला.

याआधीही झाला अपघात

घटनास्थळी योग्य ती सुरक्षा व्यवस्था नसल्याने याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी १ रिक्षा आणि ३ दुचाकीचा अपघात झाला होता. परिसरातील नागरिकांनी याबाबत काशीमीरा पोलिस ठाण्यात तसेच एमएमआरडी विभागाकडे तक्रार केली होती परंतु काही उपाययोजना झाल्या नसल्याची माहिती नागरिकांनी दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -